Hitguj Mandal sakal
लाइफस्टाइल

सांस्कृतिक समृद्धी आणि निखळ मैत्रीचं ‘हितगूज’

सांस्कृतिक समृद्धी आणि निखळ मैत्र जपणारं आमचं ‘हितगूज’ या वर्षी तिशीत पाऊल ठेवते आहे.

ज्योती आपटे

सांस्कृतिक समृद्धी आणि निखळ मैत्र जपणारं आमचं ‘हितगूज’ या वर्षी तिशीत पाऊल ठेवते आहे. आमचं हे महिला मंडळ हितगूज या नावानं तीस वर्षांपूर्वी सुरू झालं. आमची सदस्य संख्या जास्त वाढवायची नाही, अशी आम्हीच आम्हाला मर्यादा घालून घेतली आहे. आमचा कोणी अध्यक्ष नाही, कोषाध्यक्ष नाही.

दरवर्षी नवीन खजिनदार, वार्षिक फी माफक; पण खर्चासाठी पर्याप्त ठरणारी. कारणपरत्वे सदस्यांकडून खर्चासाठी निधी गोळा करतो, त्यामुळे आर्थिक व्यवहार अत्यंत पारदर्शी आहेत.

सांगली इथं गुलमोहर कॉलनीत आमच्या संस्थापिका डॉ. पुष्पाताई आरवाडे आणि (कै.) शशिताई ओक यांनी, सांस्कृतिक समृद्धी याच हेतूनं हे महिला मंडळ सुरू केलं. गुलमोहर कॉलनीत क्षमा परांजपे हिच्या घरी आमच्या बैठका सुरू झाल्या. कालांतरानं आम्हाला गुलमोहर कॉलनीतील इंजिनिअर्स आर्किटेक्ट हॉल उपलब्ध झाला.

डॉक्टर, प्रोफेसर, उद्योजिका, कलाकार, होममेकर अशा आम्ही विविध क्षेत्रांतील मैत्रिणी नियमितपणे भेटतो, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो. साहित्य, संगीत, नाटक, कविता, सण, परंपरा असा सर्वांगीण आस्वाद घेतो. वर्षातून एक सहल काढतो. आमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन साजरं करतो.

आजपर्यंत आम्ही अनेक नामवंत वक्त्यांची भाषणं आमच्या संस्थेतर्फे आयोजित केली आहेत. सिंधुताई सपकाळ, डॉ. अभय बंग, राणी बंग, विद्याताई बाळ, अनिल अवचट, डॉ. मीना प्रभू, सैनिकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सुमेधाताई चिथडे अशा नामवंतांचे मौलिक विचार आम्हाला ऐकायला मिळाले.

आमच्या ‘हितगूज’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘कवितेचे पान’ हा कार्यक्रम सांगली येथील भावे नाट्यगृहात आम्ही आयोजित केला होता. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, संगीतकार कौशल इनामदार आणि नृत्यकलाकार शर्वरी जमेनिस यांनी हा बहारदार कार्यक्रम सादर केला.

कोविड काळातही आमच्या ऑनलाइन मीटिंग सुरू होत्या. म्हणूनच मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो, की ‘हितगूज’च्या या तीस वर्षांच्या वाटचालीत, आम्ही सांस्कृतिक दृष्टीनं समृद्ध तर झालोच; पण त्याचबरोबरीने निखळ मैत्रीच्या धाग्यानंही आम्ही एकमेकींबरोबर बांधल्या गेलो.

तुमचीही अशी संस्था आहे? महिलांशी संबंधित सक्षमीकरण, उद्योजकता, एकत्रीकरण किंवा इतर विषयांत तिचं काम आहे? संस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे? तर मग आम्हाला नक्की लिहून पाठवा. शब्दमर्यादा पाचशे शब्द. लेखाबरोबर संस्थेच्या कामाशी संबंधित फोटो नक्की पाठवा.

मजकूर पाठवण्याचा पत्ता :- maitrin@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT