currency notes
currency notes google
लाइफस्टाइल

Currency Notes : नोटांच्या कडेला छापलेल्या या तिरप्या रेषांचा अर्थ काय ?

नमिता धुरी

मुंबई : १००, २०० आणि ५०० रुपयांची नोट कधी निरखून पाहिलीय का ? या नोटांच्या दोन्ही कडांवर काही तिरप्या रेषा आखलेल्या असतात. त्या कशासाठी असतात माहीत आहे का ?

नोटा छापताना चुकून या रेषा छापल्या गेल्या असतील असा समज होऊ शकतो. पण तसे नाही. म्हणूनच या रेषांबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. १००, २००, ५०० अशा बऱ्याच नोटांवर या रेषा दिसून येतील.

जर तुम्ही सर्व नोटा काळजीपूर्वक पाहिल्या तर लक्षात येईल की नोटेच्या किंमतीनुसार या ओळींची संख्या देखील वाढते. वास्तविक या ओळींना 'ब्लीड मार्क्स' म्हणतात. हे ब्लीड मार्क्स खास अंध लोकांसाठी बनवलेले आहेत.

ज्यांना दिसत नाही, त्यांच्या हातात किती रुपयांची नोट आहे ते नोटेला स्पर्श करून सहज कळू शकते. नोटेच्या वेगवेगळ्या किंमतींवर वेगवेगळ्या क्रमांकाच्या रेषा काढण्याचे हे एक कारण आहे.

नोटेवर काढलेल्या रेषा किंमत ठरवतात

अंध लोकांच्या सोयीसाठी, भारतीय रिझर्व्ह बँक सर्व नोटांवर या रेषा छापते. १०० रुपयांच्या नोटेच्या दोन्ही बाजूला 4-4 ओळी आहेत, ज्याला स्पर्श केल्यावर अंधांना समजते की ही 100 रुपयांची नोट आहे. त्याचप्रमाणे, 200 च्या नोटेवर देखील कडांवर 4-4 रेषा आहेत. पृष्ठभागावर दोन शून्य देखील आहेत.

५०० रुपयांच्या नोटेबद्दल बोलायचे झाले तर त्यावर एकूण पाच ओळी आहेत. याशिवाय 2000 च्या नोटेच्या दोन्ही बाजूला 7-7 तिरकस रेषा बनवल्या आहेत. या ओळींच्या मदतीने अंध व्यक्ती खरी नोट ओळखू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT