Daily Routine : सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. यातून आहार आणि नंतर विहाराचे जटील प्रश्न निर्माण होत आहेत.
याकडे सर्वांना लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक समस्या आपल्या समोर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आहारातील कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे जिवावर बेतू शकते.
आम्ही आधुनिकतेने आहार आणि विहार करण्यामध्ये फार कमी कालावधी मध्ये अव्वल स्थानी पोचलो आहे.
दररोज खाण्यात फास्ट फूड, अति तेलकट आणि फ्रिज मधील पदार्थ सेवन करणे आणि मद्य, शीत पेय किंवा कृत्रिम पेयाचा पिण्यात अतिरेक करणे, म्हणजेच आम्ही आधुनिक आहोत असे समजणे हे, समीकरण झाले आहे. याचा सर्वात आधी जर कोणता दुष्परिणाम होत असेल तर तो म्हणजे किडनी निकामी होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणे.
अधिक कृत्रिम अन्न आणि कृत्रिम पेयाच्या वापरामुळे हळूहळू किडनी निकामी होत आहे असे कळून सुद्धा खाण्या पिण्याच्या व्यसनाला अव्याहत पने सुरू ठेवणे, यात श्रीमंतांना मज्जा येते की काय ? असे वाटायला लागले आहे.
किडनी निकामी झाली तर किडनी ट्रान्स प्लांट करू ! ही किडनी कुठून मिळणार ? तर आहेत आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गरीब नागरिक !
रुपयांसाठी कुणीही दोन पैकी एक किडनी विकायला सहज तयार होतो. हे सत्य इतके भयानक आहे की आज देशातील अनेक महानगरामध्ये किडनी मिळवून देणारे दलाल फिरत आहेत.
अवयवदान हा इतका मोठा आणि व्यापक विषय असताना, वैद्यक कायद्याच्या चौकटीचा धुरळा उडवत किडनी रॅकेट राजरोसपणे आणि अवैध पद्धतीने आजही सुरूच आहे. देशातील गरीब जनतेच्या किडन्या रुपयांच्या भरवशावर सहज विकत घेता येवू शकतात, हा आत्मविश्वास त्यांना येतो तरी कुठून हा एक मोठा सवाल आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर किडनी बाजार असे झाले आपले नाव म्हणूनच तर परकीय गोऱ्या अंगाची माणसे भारताकडे अवयव लावून घेण्यासाठी धाव घेताना दिसतात. श्रीमंतांच्या व्यसनाचा भार गरिबांच्या अवयवांवर, हे वास्तव समोर आले आहे.
मानवी जीवन वाचवण्यासाठी अवयव दान करणे हे एक महापुण्य कार्य आहे. यात शंकाच नाही. याचं पुण्य कार्याचा गुणगौरव करून अवयव दानाचा सोहळा थोड्याशा रुपयांच्या नोटा सरकवून केला जातो आहे. हे सर्व थांबले पाहिजे, असे वाटते. म्हणून भारतीय नागरिकांनी पूर्ण भारतीय पद्धतीचा आहार आणि विहार घ्यावा.
आपल्या सर्व भारतीय पद्धतीच्या सणांमधून शरीराला आवश्यक असणारे खाद्य पदार्थ असतात. ऋतू चर्या आणि मानवी प्रकृती याचा पूर्ण विचार करूनच भारतीय दिनचर्या ठरलेली आहे. आणि ही दिनचर्या कुणाचेही कोणतेही अवयव निकामी होऊ देत नाही. (Lifestyle)
आहार विहार चांगला असला पाहिजे असा नेहमी सल्ला दिला जातो. चांगली लाइफ स्टाइल असणे आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे हे सांगितल्या जाते.
आहारात काय घ्यावे काय घेऊ नये याकरिता अनेक सल्ले किंवा वाचन उपलब्ध असतात. आहारासोबत विहार म्हणजेच कसे राहावे, सवयी यावरही आरोग्य अनारोग्य अवलंबून असते. (Health)
स्वस्थ दिनचर्येचा अवश्य भाग म्हणून दंतधावन, नित्य स्नान हे गरजेचे आहेच. याशिवाय नियमित व्यायाम हा आवश्यक आहे. काहीही न करता आळशी बसणे त्वचेचा वर्ण, कफ मेद (चरबी) कोमलता यांची वाढ करणारे आहे.
याउलट व्यायामाने शरीर सुदृढ मजबूत करते. पायी चालण्याच्या सवयीने आळसा विरुद्ध परिणाम होतात. कफ मेदाचा नाश होऊन जठराग्नि चांगली होते. भूक चांगली लागते. बल आयुष्य आरोग्यसुख वाढते. आरोग्याकडे लक्ष दिले तर अनेक प्रश्न सुटू शकतात हे मात्र निश्चित.
डॉ. हर्षवर्धन कांबळे, हनुमाननगर, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.