Daughters Day 2023  esakal
लाइफस्टाइल

Daughters Day 2023 : आई-बाबांची खास तर आजी आजोबांची लाडकी नात! काय आहे बरं 'डॉटर्स डे' चा इतिहास?

मुलीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'डॉटर्स डे' साजरा केला जातो.

साक्षी राऊत

Daughters Day 2023 : मुलीला लक्ष्मीचे रूप मानल्या जाते. आज जागतिक कन्या दिवस. मुल हे निसर्गाने पालकांना दिलेली सुंदर देणगी आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या घरात मुली जन्माला येतात ते खरंच खूप भाग्यवान असतात असे म्हटले जाते. मुलीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'डॉटर्स डे' साजरा केला जातो.

काय आहे जागतिक कन्या दिनाचा इतिहास?

स्त्री पुरुष समानतेचा सन्मान करण्यासाठी आणि मुलगा व मुलगी यांच्यातील भेदभावाची खोल दरी कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेतला होता. मुलींचे समाजातील समान दर्जाचे महत्व ओळखून, संयुक्त राष्ट्र संघाने ११ ऑक्टोबर २०१२ रोजी पहिल्यांदा मुलींचा सन्मान करण्यासाठी एक दिवस घोषित केला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो.

कन्या दिवसाचे महत्व

मुलींनी आज प्रत्येक क्षेत्रात मजल मारली असली तरी अजूनही ठिकठिकाणी स्त्रीभृण हत्या, गर्भपात, महिला अत्याचार यांसारखे प्रकार घडत आहेत. ही मानसिकता बदलणे हाच डॉटर्स डे साजरा करण्यामागचा खरा उद्देश. या दिवशी ठिकठिकाणी जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम राबविले जातात.

चूल आणि मूल ही संकल्पना समाजात मोठ्या प्रमाणात बदलताना दिसतेय. मात्र आजही समाजातील काही स्तरांत मुलींना कमी लेखल्या जाते. मात्र मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत याची जाणीव करून देण्याचा हा दिवस आहे. पण ही जाणीव या दिवसापूर्ती मर्यादित नसावी तर प्रत्येक दिवशी मुलींचा तेवढाच सन्मान अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT