birsa munda google
लाइफस्टाइल

आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी

असं सांगितले जात की बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.

दिपाली सुसर

आज बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी आहे.त्यानिमित्ताने आपण आज बिरसा मुंडा यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणार आहोत. बिरसा मुंडा एक आदिवासी क्रांतीकारक योध्दा होते. ते आजही आदिवासी समाजाचे वीर नायक होते. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेमध्ये लावले गेले आहे. ते एकटेच असे आदिवासी क्रांतीकारक आहेत ज्यांना हा बहुमान मिळाला आहे.

बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला आहे.त्याचे जन्मगाव झारखंड राज्यातील रांची हे आहे. सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्‍पत्‍याच्‍या पोटी बिरसा यांचा जन्म झाला.बिरसा हे आईवडिलांचे पहिले लेकरु आहे .त्यामुळे त्यांचे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार नाव ठेवायचा सोहळा झाला होता. बिरसा यांचे बालपण हे आदिवासी मुलांप्रमाणेच रानावनात अन ग्रामीण भागात गेले आहे. त्यांचे वडील गुराखीचे काम करायचे आणि बिरसा हे आपल्या वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.

असं सांगितले जात की बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. वाचनामुळे आपल्यालावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्याच्या मनात चीड निर्माण झाली. आणि तेव्हापासुन त्यांना इंग्रजांच्या काळया धोरणाविषयी तिरस्कार निर्माण झाला.

बिरसा मुंडा यांनी 1895 मध्ये आपला नवीन धर्म सुरू केला, ज्याला बिरसैत म्हणतात. एवढेच नाही तर या नवीन धर्माच्या प्रचारासाठी बिरसा मुंडा यांनी 12 शिष्यांची नियुक्तीही केली. आजही लोक बिरसैत धर्म मानतात पण त्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. काही तत्वेप्रामुख्याने पाळतात जसे की बिरसैत धर्मावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे.कारण कोणीही त्यात मांस, दारू, खैनी, बिडीचे सेवन करू शकत नाही. बाजारात बनवले जाणारे खाद्यपदार्थ आणि दुसऱ्याच्या घरचे अन्न यावरही बंदी आहे. गुरुवारी फुले, पाने, दातही उपटता येत नाहीत. गुरुवारी शेतीसाठी नांगरणीही करता येत नाही. बिरसैत धर्म मानणारे लोक फक्त निसर्गाची पूजा करतात आणि भजन गातात आणि लोकांना जेऊ घालतात.

सन 1894 मध्‍ये बिहार राज्‍यात भीषण दुष्‍काळ पडला होता. या दुष्‍काळामध्‍ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्‍यावेळी त्‍यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्‍वार्थी अंतःकरणाने सेवा केली.

ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्‍काळावर मात करण्‍याकरिता त्‍यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्‍या शोषणाविरुद्ध होते. त्‍यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्‍यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्‍या माध्‍यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. 1895 मध्‍ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्‍यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले.

9 जून 1900 रोजी वयाच्या 25 व्या वर्षी रांची कारागृहात त्यांचे निधन झाले.काहींचे असेही मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले.आणि इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग असे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT