DecoDecorate the pooja plate while waving the bhaubijarate the pooja plate while waving the bhaubija 
लाइफस्टाइल

भाऊबीजेला ओवाळणी करताना अशा पद्धतीने सजवा पूजेचे प्लेट

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आज देशभर भाऊबीज साजरा केला जातो.  भाऊ बहिणीचे नातं आणखीन अतूट होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या पवित्र दिवशी आरतीचे प्लेट असतेच. या पवित्र उत्सवाच्या पूजा प्लेटमध्ये मुख्यतः काही गोष्टी ठेवल्या जातात. या गोष्टींशिवाय भाऊबीजेची प्लेट अपूर्ण मानले जाते. तर भाऊबीजची पूजा प्लेट कशी तयार करावी. चला तर मग हे जाणून घेऊयात. 
 
गंगाजलच्या पाण्याने पूजा प्लेट पवित्र करून घ्या 

भाऊबीजला पूजा करण्यासाठी नवीन प्लेट घ्या त्यात गंगाजल घालून ती प्लेट पवित्र करा

पूजा प्लेटला फुलांनी सजवा 

यानंतर पूजेच्या प्लेटला लाल रंगांचे कपडे आणि फुलांनी सजवून घ्या.  

टिळा लावा

या दिवशी बहिणी भावाला टिळा लावतात आणि त्याच्या दीर्घायुषीसाठी शुभेच्छा देतात.

अक्षता ठेवा

प्लेट फुलांनी सजवल्यानंतर त्यात अक्षता ठेवा. पूजेसाठी लागणारे तांदूळ हे तुटलेलं नसावे याची काळजी घ्या. भावाला टिळा लावल्यावर माथ्यावर तांदूळ लावावे. 

नारळ 

पूजेच्या प्लेटमध्ये सुखा नारळ ठेवा. टिळा लावल्यानंतर भावाला सुखा नारळ देणे शुभ मानले जाते. 

गोड पदार्थ 

यांनतर प्लेटमध्ये गोड पदार्थ ठेवा. त्यानंतर भावाला गोड पदार्थ  खाऊ घाला. या दिवशी भावाला गोड पदार्थ  खाऊ घालणे शुभ मानले जाते. 

दिवा 

भाऊबीज पूजेच्या प्लेटमध्ये गोड पदार्थ ठेवल्यांनंतर दिवे(आरती) ठेवा. टिळा लावल्यानंतर भावाला आरतीने ओवळा. 

भाऊबीज दिवशी बहिणींना द्या भेटवस्तू 

भाऊबीज दिवशी भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून एखादी तरी भेटवस्तू दिलीच पाहिजे. या दिवशी बहिणीला भेटवस्तू न देणे हे अशुभ मानले जाते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT