लाइफस्टाइल

Health Care News : या हार्मोनच्या कमतरतेमुळे होते डोकेदुखी, अशी घ्या काळजी..

या हार्मोनच्या कमतरतेमुळे होते डोकेदुखी..

Aishwarya Musale

ताणतणाव, वेळेवर न खाणे, जास्त वेळ स्क्रीन पाहणे यामुळे डोकेदुखी होऊ शकते. काहींना संध्याकाळी डोकेदुखीचा त्रास सुरू होतो तर काहींना सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होते.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील डोकेदुखी, शरीरात सूज येते आणि तुम्हाला न्यूरॉन्सचा त्रास होऊ लागतो. तसेच आजकाल ताण-तणाव आणि चिंता यासह अनेक कारणांमुळे बहुतांश लोकांना डोकेदुखीचा त्रास होत असतो. त्यामागे एकच ठोस असे कारण नाही, पण अनेक कारणांमुळे डोकं दुखू शकतं.

परंतु कधीकधी हार्मोनल कमतरतेमुळेही डोकेदुखी होऊ शकते. शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाल्यावर डोकेदुखी उद्भवते. या हार्मोनच्या कमतरतेमुळे केवळ डोकेदुखीच नाही तर इतरही अनेक समस्या निर्माण होतात.

शरीरावर इस्ट्रोजेन हार्मोनचा प्रभाव

या हार्मोनच्या कमतरतेमुळे शरीरात बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. यामुळे वजन वाढते. याशिवाय निद्रानाश आणि थकवाही कायम राहतो.

इस्ट्रोजेन वाढवण्यासाठी काय खावे

ताक, लोणी, दही, तूप खावे. त्याच वेळी, जर तुम्ही जवसाच्या बियांचे सेवन केले तर ते तुमच्या इस्ट्रोजेनची पातळी वाढवू शकते. यातून महिलांच्या इतर अनेक समस्या सुटू शकतात.

सोयाबीन खाल्ल्याने इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वाढते. प्रथिनांच्या व्यतिरिक्त, सोयाबीनमध्ये फायबर, खनिजे, फायटोस्ट्रोजेन आणि जीवनसत्त्वे बी आणि ई भरपूर असतात. तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता.

आम्ही तुम्हाला सांगतो की हे इलेक्ट्रोलाइट्स आणि इस्ट्रोजेन हार्मोन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.

अ‍ॅवोकॅडो खाणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. त्यात फॅट, व्हिटॅमिन बी6 आणि पोटॅशियमचे गुणधर्म असतात. यामुळे इस्ट्रोजेनची पातळी वाढते.

डोकेदुखीची कारणे

तणाव आणि चिंता

जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल किंवा तणाव असेल तर त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. कारण या दोन्ही घटकांमुळे डोकेदुखीचा त्रास होतो.

अपुरी झोप

जर तुम्हाला चांगली आणि पूर्ण झोप मिळाली नाही तर डोकेदुखीचा त्रास होणे स्वाभाविक आहे. अपुऱ्या झोपेमुळे बरेच त्रास होऊ शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे अनेकदा लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या दिसून येते.

हार्मोनल बदल

हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. म्हणूनच आपला आहार निरोगी ठेवावा आणि नियमित व्यायाम करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT