denim outfit look perfect shopping tips lifestyle marathi news 
लाइफस्टाइल

डेनिम आऊटफिट मध्ये परफेक्ट दिसायचे आहे तर खरेदी करताना  'ही' घ्या काळजी 

अर्चना बनगे

कोल्हापूर: बदलत्या जमान्यात युवा पिढीला कपडयांचे अनेक पर्याय उपलब्ध  झाले आहेत.  जीन्स आणि डेनिम फिटिंग चे कपडे  खूप जण पसंत करतात. परंतु कोणतेही कपडे खरेदी करताना आपल्याला काही खबरदारी घ्यावी लागते. डेनिम ची कपडे प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगळा लूक देतात. त्यामध्ये ड्रेस, जीन्स, शॉर्ट, शर्ट असे अनेक कपडे आहेत .मुलींनासुद्धा  याचे  विशेष आकर्षण आहे. डेनिम, जीन्स कपड्याचा वापर पण कोणत्याही ठिकाणी करू शकतो. हे कपडे केवळ दिसण्यासाठी चांगले असतात असे नाही तर त्यामुळे आपला रुबाब वेगळा वाटतो . आजकाल यामध्ये  अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.  खरेदी करताना  परफेक्ट लुक दिसेल अशीच खरेदी करणे आवश्यक आहे. हे खरेदी करताना आपण काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पॉकेट ची रचना ..

अनेक मुली जिन्स मध्ये पॉकेट ची मागणी करतात. परंतु अशी  खरेदी करताना  पॉकेट मागच्या बाजूस असणे गरजेचे आहे.असे पॉकेट एक वेगळे लूक देतात .अशा कपड्यांवर तुम्ही अधिक स्लिम आणि फिट दिसता. त्यामुळे डेनिम, जीन्स खरेदी करताना कपड्यांना योग्य ठिकाणी  पॉकेट आहेत का नाही याची आपण खात्री करावी.

स्ट्रेचेबल जीन्स आऊटफिट

कोणतेही कपडे परिधान करत असताना ते सहजपणे  घालता यावे  अशाच प्रकारच्या कपड्यांची खरेदी करावी. डेनिम ड्रेस स्ट्रेचेबल असतील तर आपण ते परिधान करताना सुलभता राहते. जीन्स खरेदी करताना आपल्याला फिटनेस बरोबरच ते कापड स्ट्रेचेबल आहे का याची खात्री करावी.

साइज बाबत दक्षता घ्या

डेनिम ची खरेदी करताना आपण आपल्या शरीराची रचना आणि त्यावर  कपडे कसे दिसतील  याबाबत दक्षता घ्यावी. आपल्याला लागणारी साइज  पाहून मग कपड्यांची निवड करावी.अनेक मुलींना असे वाटते  की जर लहान साईज घेतली तर आपण अधिक स्लिम दिसू परंतु यामुळे  लुक बिघडून जाईल आणि तुम्हाला कपडे परिधान केल्यानंतर समाधान वाटणार नाही. शॉर्ट ,शर्ट घेतानाही त्याची साईज काय आहे याची  जरूर खात्री करून घ्या.


रंगाची खात्री करा 

आपण कपडे खरेदी केल्यानंतर त्याचा रंग किती दिवस टिकणार  याबद्दल आपल्या मनात अनेकदा साशंकता निर्माण होते. कपड्यांचे रंग जाण्याची भीती आपल्या मनात असते. रंग गेल्यानंतर कपड्याची असणारी चमक कमी होते. अनेक वेळा असे  कपडे  वापरू शकत नाही . डेनिम आऊटफिट खरेदी करताना गडद रंग ऐवजी  फिकट रंगाला अधिक प्राधान्य द्या. लाईट कलर डेनिम, जीन्स व शॉट्स अथवा शर्ट दिसण्यासाठी अत्यंत क्लासिकल वाटतात आणि यातील कलर जाण्याची भीतीही कमी असते.

डेनिम जीन्स 

डेनिम जीन्स मध्ये अनेक व्हरायटी  पाहावयास मिळतात. परंतु यातील कमी(लो वेस्ट ), मध्यम(मेडियम) आणि जादा(हाय वेस्ट )  अशा कंबर प्रकारला  महत्त्व दिले जाते. हे कपडे आपण परिधान करीत असताना काही गोष्टी ध्यानात राहणे आवश्यक आहे. लो वेस्ट जीन्स आपल्या बेंबीपासून दोन ते तीन इंच खाली ठेवली जाते. मीड वेस्ट ची जीन्स बेंबी पर्यंत तर तेच हाय वेस्ट ची जीन्स  बेंबीच्या वरती असते. जर तुमचे पोट सपाट असेल तर लो वेस्ट जीन्स तुम्ही सहजपणे ट्राय करू शकता. मिड आणि हाय वेस्ट जीन्स हे अत्यंत कम्फर्ट मानले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT