Deodorant Myth esakal
लाइफस्टाइल

Deodorant Myth : डिओड्रंट लावल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो? जाणून घेऊयात सत्य!

काही लोकांना तर याचे एवढे वेड आहे की ते भरमसाठ परफ्यूम वापरतात. ज्यामुळे लोक त्यांना विचारतात की, परफ्यूमने अंघोळ केलीय का?

सकाळ डिजिटल टीम

Deodorant Myth Or Fact : परफ्यूम वापरणे ही फॅशन नाही तर सवय झाली आहे लोकांची. मोठ्या पार्टीला जाणे असो वा कट्ट्यावर मित्रांच्यात जाणे असो परफ्यूम वापरलाच जातो. काही लोकांना तर याचे एवढे वेड आहे की ते भरमसाठ परफ्यूम वापरतात. ज्यामुळे लोक त्यांना विचारतात की, परफ्यूमने अंघोळ केलीय का? हा झाला मजेचा पार्ट पण या भरमसाठी परफ्यूमबद्दल अनेक समजूती आहेत. त्यापैकी एक म्हणजे परफ्यूमच्या अती वापराने स्तनांचा कँसर होतो.

परफ्यूम घामाचा वास दूर करून आपले व्यक्तिमत्व प्रभावी बनवते. स्त्रिया अत्तराचा सुगंध अतिशय विचारपूर्वक पाहूनच देव घेतात. पण अनेक लोकांचा असा विश्वास आहे की डिओडोरंट लावल्याने महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यांचा असा विश्वास आहे की डिओडोरंटमध्ये अ‍ॅल्युमिनियम असते. जे शरीरात मिसळल्याने स्तनाचा कर्करोग होतो. याबाबत डॉक्टरांची भूमिका वेगळी असली तरी त्यात किती खरेपणा आहे हे तपासूयात.

Deodorant Myth

परफ्यूम लावल्याने महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत नाही. ही केवळ एक गैरसमजूत आहे. ज्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही. इंटरनेटवर पसरलेली ही अफवा चुकीची असून याला कोणताही आधार नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डिओडोरंटवर अंडर आर्म रोलमुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. हे सिद्ध करणारा असा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. बरेच लोक असा दावा करतात की या डिओडोरंटमध्ये अ‍ॅल्युमिनियम आढळते जे घामाच्या ग्रंथींना रोखू शकते. शरीरात शोषले जाऊ शकते. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. जरी हे सर्व दावे चुकीचे आहेत.

Deodorant Myth

डिओडोरंट्समध्ये अ‍ॅल्युमिनियमचे प्रमाण फारच कमी असते. ज्यामूळे कँसर होण्याची शक्यता फार कमी असते. डिओडोरंटमध्ये केवळ 0.012 टक्के अ‍ॅल्युमिनियम आढळते. जे आपल्या शरीरासाठी धोकादायक नाही. त्यामुळे कोणतीही भिती न बाळगता परफ्यूम किंवा डिओडोरंट लावा.

या कारणाने नव्हे तर इतर अनेक कारणांनी स्तनांच्या कँसरचा धोका असतो. अनेकांना केवळ कँसरचे नाव जरी ऐकले तरी भिती वाटते. पण आपल्याला कधी अशा समस्येचा सामना कारावा लागू नये यासाठी वजन नियंत्रणात ठेवा, व्यायाम करा आणि तंदुरुस्त रहा, दारूपासून दूर रहा आणि स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaidyanath Karkhana: गोपीनाथ गडाचा परिसर असलेल्या जमिनीचीही विक्री; 'वैद्यनाथ'कडे असलेली बाकी कोण देणार? पंकजा मुंडेंचं अजूनही मौनच

चिमुकल्यांसाठी धमाल घडवणारं नाटक रंगभूमीवर; 'माकडचाळे' बालनाट्याचा दिवाळीत होणार शुभारंभ; माकडाच्या भूमिकेत कोण दिसणार?

Pregnancy Nutrition Tips: ए. जी. ई म्हणजे नेमकं काय? गरोदरपणावर त्याचा काय परिणाम होतो? वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

Satana Election News : 'मतदार यादीतील दुबार नावे हा लोकशाहीचा खून'; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Pune Police : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून १८ सराईत गुन्हेगार तडीपार

SCROLL FOR NEXT