Diabetes Control Fruits esakal
लाइफस्टाइल

Diabetes Control Fruits : मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात 'या' फळांचा करा समावेश, रक्तातील साखर झटकन विरघळेल

Diabetes Control Fruits : आजकाल मधुमेह हा सामान्य आजार झाला आहे. मधुमेह होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव होय.

Monika Lonkar –Kumbhar

Diabetes Control Fruits : आजकाल मधुमेह हा सामान्य आजार झाला आहे, हा आजार सर्वच वयोगटांमध्ये आढळून येतोय. मधुमेह होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव होय.

मधुमेह एकदाच होतो मात्र, आयुष्यभर त्यातून सुटका होत नाही. त्यामुळे, या आजारापासून दूर राहणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये मधुमेह असलेल्या रूग्णांनी काही आरोग्यदायी सवयींचा अवलंब केल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणली जाऊ शकते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेहींनी त्यांच्या आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेल्या फळांचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे. ही फळे खाल्ल्याने मधुमेहाच्या रूग्णांना मोठा फायदा होऊ शकतो. या फळांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल. कोणती आहेत ही फळे? चला तर मग जाणून घेऊयात.

खरबूज

उन्हाळ्यात खरबूज आणि कलिंगड या फळांना सर्वाधिक मागणी असते. या फळांचे उन्हाळ्यात आवर्जून सेवन केले जाते. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमीन बी-१, बी-३, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमने समृद्ध असलेले खरबूज आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायेदशीर आहे.

या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ५४ असून तो अतिशय कमी आहे. त्यामुळे, मधुमेहींनी त्यांच्या आहारात या फळाचा जरूर समावेश करावा. या फळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

केळी

प्रथिने आणि कॅल्शिअमने युक्त असलेली केळी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायेदशीर आहेत. केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ५१ असून, जो अतिशय कमी आहे. केळीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाते.

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमीन सी आढळून येते, जे रक्तदाब कमी करण्यास आणि कर्करोग तसेच दमा टाळण्यासाठी मदत करतात.

चेरी

लालबुंद असलेली चेरी व्हिटॅमीन सी, पोटॅशिअम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे, चेरी ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या चेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स केवळ २० आहे, जो अत्यंत कमी आहे. त्यामुळे, या फळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाते. त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात चेरीचा जरूर समावेश करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT