Diwali 2022 esakal
लाइफस्टाइल

Diwali 2022: येत्या दिवाळीला रात्री करा दक्षिणावर्ती शंखाची पूजा अन् घालवा आर्थिक अडचणी

लक्ष्मी मातेच्या शंखाची महिमा तुम्हाला माहितीये काय? आजच वाचा ही महत्वपूर्ण माहिती

सकाळ डिजिटल टीम

Diwali pooja: यंदा २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. तर नरक चतुर्दशी २४ ऑक्टोबरला आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची खास विधी शास्त्रात सांगितली जाते. त्यामुळे माता लक्ष्मी व्यतिरिक्त लक्ष्मी मातेच्या आवडत्या शंखाची पूजा केली जाते. असे केल्यास धनप्राप्तीबरोबरच माता साक्षात तुमच्या घरी निवास करते अशी मान्यता आहे. चला तर जाणून घेऊया दिवाळीला कशी करायची दक्षिणावर्ती शंखाची पूजा.

काय असतं दक्षिणावर्ती शंख?

भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि देवी दुर्गाच्या हातात जो शंख असतो त्याला दक्षिणावर्ती शंख असे म्हटले जाते. या शंखाचं तोंड दक्षिण भागाच्या बाजूने उघडं असतं. त्यामुळे यास दक्षिणावर्ती शंख असे म्हटले जाते. पुराणातील कथेनुसार समुद्रमंथनातून जे १४ रत्न प्राप्त झालेत होते त्यातील एक शंख म्हणजे दक्षिणावर्ती शंख.

दिवाळीत अशी करा दक्षिणावर्ती शंखाची पूजा

दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. दिवाळीच्या दिवशी त्याला घरात आणणं फार शुभ मानलं जातं. जर सिद्ध मंत्रांनी शंखाची स्थापना केली तर

जीवनात कधी धनाची कमतरता भासणार नाही.

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेदरम्यान शंखाला गंगाजलात घालून त्याला पूजेच्या पाटावर ठेवा. जिथे तुम्ही देवीची स्थापना केली असेल.

त्यानंतर 'ॐ श्री लक्ष्मी सहोदराय नम:' असा १०८ वेळा जप करा.

लक्ष्मीपूजनानंतर त्याला लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये पवित्र स्थानी ठेवा जेथे कोणाचीही नजर पडणार नाही.

असे केल्या पैशांच्या सगळ्या समस्या दूर होतात आणि धनलाभ होतो असे मानले जाते.

दक्षिणावर्ती शंख घरात ठेवण्याचे फायदे

हा शंख घरात ठेवल्यास लक्ष्मी मातेच्या सकारात्मक उर्जेत वृद्धी होते. त्यामुळे घरात भरभरात आणि समृद्धी नांदते.

या शंखाच्या प्रभावाने शक्तीशाली राक्षसही शांत पडतो. याच्या प्रभावाने गृहक्लेश, गंभीर आजार आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : इस्लामपूरचं नाव बदललं! आजपासून ईश्वरपूर

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT