Diwali 2023 esakal
लाइफस्टाइल

Diwali 2023 : यंदाच्या दिवाळीला इकोफ्रेंडली पद्धतीने करा घराची सजावट, मिळेल आकर्षक लूक

दिवाळीच्या आधी घरांची स्वच्छता केली जाते आणि सजावट केली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali 2023 : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण होयं. दिवाळी आपल्या भारतात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदाची दिवाळी ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

दिवाळीच्या आधी अनेक जण घरांची स्वच्छता करतात, साफ-सफाई करतात. दिवाळीची सजावट करतात. दरवर्षी मार्केटमधील वस्तूंचा, लायटिंगचा वापर करून जर तुम्ही सजावट करत असाल तर यावर्षी इकोफ्रेंडली सजावट करून बघा.

या इकोफ्रेंडली सजावटीमुळे घराची शोभा वाढवण्यास नक्कीच मदत होईल. यंदाच्या दिवाळीला तुम्ही देखील इकोफ्रेंडली पद्धतीने घराची आकर्षक सजावट करू शकता. या संदर्भातल्या आयडियाज आणि टिप्स आपण जाणून घेऊयात.

हॅंडमेड पेपर आणि फुलांचा करा वापर

दिवाळीत घराची सजावट केल्यामुळे घराला आणखी शोभा येते आणि घर सुंदर दिसते. घराची सजावट करण्यासाठी तुम्ही हॅंडमेड पेपर, रंगीत कागद यांचा वापर करू शकता. तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये या कागदांना तुम्ही शेप देऊ शकता.

घराच्या सजावटीसाठी तुम्ही विविध रंगांच्या हॅंडमेड पेपरचा हव्या त्या पद्धतीने वापर करू शकता. सजावटीचा हा उत्तम पर्याय आहे. या पेपरपासून तुम्ही विविध प्रकारच्या डिझाईन्स ट्राय करू शकता. शिवाय, यामध्ये तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याची गरज भासणार नाही. अगदी कमी पैशांमध्ये तुम्ही घर सजवू शकता.

विविध प्रकारची फुले दिवाळीमध्ये बाजारात उपलब्ध होतात. या फुलांचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या माळा करू शकता.

फुलांच्या आकर्षक रांगोळ्या

रांगोळी आणि दिवाळी यांचे अनोखे कॉंम्बिनेशन आहे. दिवाळीमध्ये विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. मात्र, यंदा रांगोळी आणि रंगाचा अपव्यय टाळून तुम्ही फुलांची आकर्षक रांगोळी काढू शकता.

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही विविध प्रकारची फुले, पाने आणि तांदूळ, सुपारी इत्यादी गोष्टींचा वापर करू शकता. या सर्व घटकांचा वापर केल्यावर रांगोळी आणखी सुंदर दिसण्यास मदत होते आणि तुमची रांगोळी पर्यावरणपूरक ठरते.

शिवाय, या इकोफ्रेंडली रांगोळीमध्ये रंग भरण्यासाठी तुम्ही कुंकू, हळद, कॉफी पावडर आणि तांदूळ यांचा ही वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT