Diwali 2023 esakal
लाइफस्टाइल

Diwali 2023 : यंदा बेसनाचे लाडू नको तर बर्फी बनवा, रेसिपी आहे सोप्पी अन् पटकन होणारी

लाडवाच्या तूप साखरेच्या प्रमाणात अडकू नका, बेसन बर्फी खाऊन बघा

Pooja Karande-Kadam

Diwali 2023 :

दिवाळीची जोरदार तयारी घरोघरी सुरू झाली आहे. गृहिणीही फराळाची तयारी करत आहेत. काही मैत्रिणींचे तर सगळे पदार्थ बनवून झाले असतील. दिवाळीत पुर्वापार चालत आलेले पदार्थ आपण नेहमीच बनवतो. यात लाडूचे अनेक प्रकार आहेत. तुमचे बुंदी अन् रव्याचे लाडू बनवून झाले असतील. तुम्ही बेसनाचे लाडू बनवण्याचा विचार करत असाल. तर एकदा ही रेसिपी नक्की पहा.

बेसनाचा लाडू जास्त तूप घालून बनवले तरच ते हवे तसे बनतात. पण, त्याचे प्रमाण चुकले तर मात्र लाडू गळून पडतात. त्यामुळे कमी वेळेत होणारी साधी आणि सोप्पी बेसनाची बर्फी तुम्ही नक्की बनवा. (Diwali Recipe 2023)

राजस्थानात या बर्फीला मोहनथाळ म्हणतात. पाव किलो डाळीचे पीठ, पाव किलो खवा व अर्धा किलो साखर, भरपूर बदामाचे काप घालून हा मोहनथाळ करतात व पक्वान्न म्हणून वापरतात. त्याला वर चांदीचा वर्ख लावतात.

साहीत्य -  

२ वाट्या डाळीचे जाडसर पीठ, १०० ग्रॅम खवा, १ ग्रॅम केशरी रंग, ५-६ वेलदोड्यांची पूड, १ वाटी तूप, ३ वाट्या साखर, बदाम काप.

राजस्थानात या बर्फीला मोहनथाळ म्हणतात

कृती :

  • डाळीचे पीठ १ वाटी तूप घालून गुलाबी रंगावर भाजावे.

  • डाळीचे पीठ खाली उतरवून त्यात खवा हाताने मोडून मिसळावा. ३ वाट्या साखर १ वाटी पाणी घालून दोन तारी पाक करावा. पाकात थोडा केशरी रंग व वेलदोडा पूड घालावी.

  • पाक खाली उतरवून त्यात बेसन व खव्याचे मिश्रण घालून चांगले घोटावे. गोळी अजिबात राहता कामा नये.

  • चौकोनी ट्रेला तुपाचा हात लावून मिश्रण घालावे. पातळ मिश्रण ओतल्याने प्लॅस्टिक पेपरने वड्या थापाव्या लागत नाहीत. ट्रे हलवला तरी मिश्रण सारखे परसते. वरती बदामाचे काप घालावेत व अर्ध्या तासाने चौकोनी वड्या कापाव्यात.

महत्त्वाची टीप :

ह्या वड्या खव्याने मऊसूत होतात. खवा भाजून घ्यायचा नाही. कड़क वड्या चांगल्या लागत नाहीत. खव्याचे प्रमाण दुप्पट असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT