Diwali  sakal
लाइफस्टाइल

Diwali 2023: यंदाच्या दिवाळीत अशी करा फुलांनी घराची सजावट, घराला येईल उत्तम लूक

घराची सजावट करून द्या घराला नवा लुक

Aishwarya Musale

तुम्हाला तुमच्या घराला जर कमी वेळात पूर्णपणे नवीन लूक द्यायचा असेल, तर तुम्ही खालील प्रकारे फुलांनी पटकन सजवू शकता. तुम्ही काही दिवसांपूर्वी घराला रंगरंगोटी आणि साफसफाई केली असेल, पण तरीही, फुलांनी घर सजवल्याशिवाय ते सुंदर दिसणार नाही. कमी वेळेत आणि कमी खर्चात तुम्ही तुमचे घर कसे सजवू शकता ते पहा.

दिवाळीत पडदे धुतले नसतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. पडद्यावर फुलं लावूनही तुम्ही त्याला नवा लुक देऊ शकता. यामुळे तुमच्या घराचे सौंदर्य आणखी वाढेल.

नवीन पद्धतीने रांगोळी काढायची असेल तर फुलांनी रांगोळी काढता येते. हे बनवायला खूप सोपे आहे. सजावटीशिवाय रांगोळीसाठी गुलाबाची फुलेही वापरू शकता. यासाठी सुंदर फुलांचा वापर करावा, जे दिसायलाही सुंदर असतात. यासाठी तुम्ही पांढरा, केशरी रंग वापरू शकता.

तुमच्या घरात फ्लॉवर पॉट्स असतील तर तुम्ही त्यांना नवीन लुक देऊ शकता. त्यात अनेक प्रकारची फुले लावून तुम्ही ते आकर्षक बनवू शकता. हे डेकोरेशन अधिक आकर्षक करण्यासाठी तुम्ही रेन लिली आणि अॅमेरेलीस लिलीची फुलेही लावू शकता.

दिवाळीत तुमच्या घराला नवा लुक द्यायचा असेल तर गुलाब आणि झेंडूच्या फुलांनी घर सजवा. ते पूर्णपणे आकर्षक दिसेल आणि फुलांच्या ताजेपणामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न राहील.

दिवाळीत दरवाजे जर डेकोरेशनशिवाय असतील तर ते रिकामे दिसतात. त्यामुळे तुम्ही फुलांनी सजवू शकता. डेकोरेशनसाठी तुम्ही चमकदार लाल आणि गुलाबी, पिवळी किंवा पांढरी फुले घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT