Diwali Outfit Ideas esakal
लाइफस्टाइल

Diwali Outfit Ideas : दिवाळीला हटके दिसायचयं? मग, ट्राय करा हे इंडो-वेस्टर्न लूक्स

दिवाळीला काहीतरी वेगळा लूक ट्राय करायचा असेल तर, इंडो-वेस्टर्न लूक बेस्ट आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Outfit Ideas : अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. आपल्या देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की अनेकदा महिलांना पारंपारिक लूक करायला आवडतो.

मात्र, नेहमी तसाच लूक करण्यापेक्षा काहीतरी वेगळा लूक ट्राय करायचा असेल तर, इंडो-वेस्टर्न लूक बेस्ट आहे. यंदाच्या दिवाळीला हा इंडो-वेस्टर्न लूक तयार करण्यासाठी आज आम्ही काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या इंडो-वेस्टर्न लूकच्या खास टिप्स.

इंडो-वेस्टर्न स्टाईल स्कर्ट

धोती स्टाईल स्कर्टची आजकाल खूपच चलती आहे. मुलींमध्ये तर या प्रकारच्या स्कर्टची खूपच क्रेझ आहे. या दिवाळीला तुम्ही देखील अशा पद्धतीचा इंडो वेस्टर्न स्टाईल धोती स्कर्ट नक्कीच स्टाईल करू शकता.

shilpa shetty

मार्केटमध्ये या प्रकारेच स्कर्ट तुम्हाला आरामात २००० पर्यंत मिळू शकतात. शिवाय, यामध्ये अनेक प्रकारचे कलर्स देखील उपलब्ध आहेत.

फ्रिल स्कर्ट स्टाईल साडी

फ्रिल स्कर्ट स्टाईल साडीची देखील महिलांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या लूकमुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला चारचॉंद लागतील यात काही शंकाच नाही. अभिनेत्री शिल्पा शेट्टीप्रमाणे तुम्ही देखील हॉल्टर नेक स्टाईल ब्लाऊज सोबत तुम्ही फ्रिल स्कर्ट स्टाईल करू शकता.

या लूकवर तुम्हाला मोकळ्या केसांची हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअफ आणि डायमंड ज्वेलरी कॅरी करावी लागेल. मग तुमचा लूक परफेक्ट दिसेल.

गरारा विथ पेपलम टॉप

मार्केटमध्ये सध्या पेपलम टॉपला महिलांची खास मागणी आहे. या प्रकारचे टॉप तुम्ही स्कर्ट किंवा गरारावर ही स्टाईल करू शकता. दिवाळीसाठी हा एक वेगळा आणि हटके लूक तुम्हाला मिळवून देऊ शकतो.

shilpa shetty

हे पेपलम टॉप दिसायला ही सुंदर असतात. तुम्हाला इंडो-वेस्टर्न लूक करण्यासाठी फक्त या पेपलम टॉपसोबत गरारा परिधान करा. हा गरारा लूक तुम्हाला परफेक्ट दिवाळी लूक मिळवून देईल. या लूकवर तुम्ही ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी कॅरी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

SCROLL FOR NEXT