Diwali Rangoli Designs esakal
लाइफस्टाइल

Diwali Rangoli Designs : नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनासाठी काढा ‘या’ आकर्षक पिकॉक स्टाईल रांगोळ्या

दिवाळीमध्ये आकर्षक आणि सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali 2023 : दिवाळीला नुकतीच सुरूवात झाली आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा सण आहे. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा सण रविवारी १२ नोव्हेंबरला अर्थात आज साजरा केला जाईल. दिवाळीमध्ये फराळ, पूजा, घराची सजावट आणि घरासमोर काढली जाणारी रांगोळी याला फार महत्व आहे. दिवाळीमध्ये आकर्षक आणि सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. या रांगोळ्या आपल्या अंगणाची शोभा वाढवतात

तुम्ही सुद्धा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनासाठी खास मोराच्या डिझाईन्सच्या आकर्षक रांगोळ्या काढू शकता. या रांगोळ्या काढायला अगदी सोप्या आणि सिंपल आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या पिकॉक स्टाईल रांगोळी डिझाईन्स.

मोराची डिझाईन

दिवाळीमध्ये विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. या रांगोळ्यांमध्ये खास आकर्षण असलेली मोराच्या डिझाईनची रांगोळी हमखास काढली जाते. अनेक महिलांना मोराच्या डिझाईनची रांगोळी आवडते. ही मोराच्या डिझाईनची रांगोळी काढायला एकदम सोपी आहे.

मोरपिसाचा एक हटके टच तुम्ही या रांगोळीप्रमाणे देऊ शकता. ज्यामुळे, तुमची रांगोळी आणखी उठावदार दिसेल.

मोर आणि पणती

मोर आणि पणतीची डिझाईन हे एक भन्नाट कॉंम्बिनेशन आहे. ही डिझाईन तुम्ही  खास नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनासाठी काढू शकता. एक मोठा गोल काढून त्यात पणतीची डिझाईन आणि हवी ती फुलांची डिझाईन तुम्ही काढू शकता.

या गोलाच्या आऊटलाईनला तुम्ही मोर काढू शकता. त्यात तुम्हाला आवडणारे आणि हवे ते आकर्षक रंग भरून रांगोळी आणखी आकर्षक बनवू शकता.

लक्ष्मीची पावले आणि मोर

या रांगोळीप्रमाणे हर्टचा आकार काढून त्यामध्ये लक्ष्मीची पावले आणि २ मोरांची आकर्षक डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता.

या रांगोळीची आऊटलाईन बॉर्डर आणि मोर विशेष भाव खाऊन जात आहेत. या प्रकारची रांगोळी काढून तुम्ही त्यात हवे ते रंग भरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

जेवताना उचकी लागली, नंतर नाकातून रक्त आलं अन्...; कॉलेजमध्येच विद्यार्थिनीसोबत अघटीत घडलं

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

Latest Maharashtra News Updates : पोलिसावर धावून गेला,आळंदीत रिक्षा चालकावर कारवाई

Narendra Modi: मोदींच्या सभेत महिलांचं 'खुर्ची युद्ध'! एकमेकींच्या डोक्यात घातल्या चेअर, Video Viral

SCROLL FOR NEXT