Diwali 2023 esakal
लाइफस्टाइल

Diwali 2023 : दिवाळीला ट्राय करा 'या' सिक्वेन्स साड्या, दिसाल एकदम झक्कास!

यंदाची दिवाळी ही अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali 2023 : दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी होयं. दिवाळीमध्ये विविध खाद्यपदार्थ, मिठाई, फराळ, नवीन कपडे, आकाशकंदील इत्यादी अनेक गोष्टींची रेलचेल असते. यंदाची दिवाळी आता अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपली आहे.

त्यामुळे, सर्वत्र दिवाळीची लगबग पहायला मिळत आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये कोणता लूक करावा? असा प्रश्न महिलांना नेहमीच पडतो. साडी, विविध प्रकारचे आऊटफीट्स, ज्वेलरी, हेअरस्टाईल्स अशा सर्वच गोष्टींची महिलांना तयारी करावी लागते.

यंदाच्या दिवाळीत तुम्ही सुद्धा साडीचा लूक करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला डिझायनर सिक्वेन्स साडींचे पर्याय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात डिझायनर सिक्विन्स साड्यांचे ऑप्शन्स.

रेड सिक्वेन्स साडी

दिवाळीला नेहमीप्रमाणे पारंपारिक साड्या नेसण्यापेक्षा तुम्ही रेड सिक्वेन्स साडी नक्कीच नेसू शकता. हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सिक्वेन्स साड्या पार्टी परफेक्ट साड्या आहेत. त्यामुळे, दिवाळी पार्टीला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

या रेड कलरच्या साडीवर संपूर्ण सिक्वेन्स वर्क असते आणि याचा पल्लू आणि साडीची बॉर्डर ही खास असते. त्यामुळे, तुमच्या संपूर्ण लूकला चारचॉंद लागतील यात काही शंका नाही. लाल रंग हा नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतो. त्यामुळे, या प्रकारची साडी दिवाळी पार्टीला नक्की नेसा मग बघा तुमच्या लूकला कसे चारचॉंद लागतात ते.

पर्पल सिक्वेन्स साडी

मागील काही दिवसांमध्ये महिलांची पर्पल अर्थात जांभळ्या रंगाच्या साडीला भरपूर मागणी वाढली आहे. दिवाळीला जर तुम्हाला पर्पल रंगाची लाईटवेट सिक्वेन्स साडी नेसायची असेल तर हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो.

ही साडी नेसल्यानंतर त्यावर मोकळे केस सोडून छान हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. त्यानंतर, तुम्ही साडीवर मॅचिंग होणारी खड्यांची ज्वेलरी घालून तुमचा लूक पूर्ण करू शकता.

सिल्वर वर्क सिक्वेन्स साडी

सिल्वर हा रंग दिवाळीसाठी एकदम परफेक्ट आहे. सिल्वर रंगाची साडी नेसल्यानंतर तुमचा लूक एकदम क्लासी दिसतो. या रंगाची साडी नेसल्यावर त्यावर मोकळे केस किंवा मेस्सी बनची हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. यामुळे, तुमचा लूक उठून दिसेल, यात काही शंका नाही.

या साडीवर तुम्ही खड्यांची ज्वेलरी, चोकर किंवा छानसं गळ्यातल आणि हटके कानातले घालून तुमचा लूक पूर्ण करू शकता. दिवाळीसाठी किंवा दिवाळी पार्टीसाठी ही सिल्वर रंगाची सिक्वेन्स साडी एकदम परफेक्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT