Diwali  sakal
लाइफस्टाइल

Diwali 2023: उठा उठा दिवाळी आली, शॉपिंग करण्याची वेळ झाली! गरजेच्या सामानाची यादी बनवताना या टिप्स येतील कामी

गरजेच्या सामानाची यादी बनवताना या टिप्स येतील कामी

Aishwarya Musale

दिव्यांचा सण दिवाळी जवळ आली आहे. 10 नोव्हेंबरपासून धनत्रयोदशीपासून दिवाळी सुरू होत आहे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशीनंतर छोटी दिवाळी आणि नंतर दिवाळी साजरी केली जाते. यानंतर गोवर्धन पूजा आणि भाऊ बीजचा सण येतो. या पाच दिवसांच्या विशेष सणाची उत्सुकता सर्वांनाच असते.

अनेक दिवस आधीच तयारी सुरू होते. अनेकदा लोक दिवाळीच्या दिवसापर्यंत बाजारपेठांमध्ये फिरत असतात. दिवाळीच्या निमित्ताने लोक अनेकदा बाजारात जातात. पूजेच्या वस्तूंपासून ते गृहसजावटीच्या वस्तूंपर्यंत, लक्ष्मी गणेशाची मूर्तींपासून ते कुटुंबातील सदस्यांसाठीच्या कपड्यांपर्यंत, धनत्रयोदशीच्या काळात लोक भेटवस्तूंसाठी भरपूर खरेदी करतात.

दिवाळीच्या निमित्ताने सतत बाजारात जाणे टाळायचे असेल आणि सणासुदीची सर्व खरेदी एकाच वेळी करायची असेल, तर दिवाळीच्या खरेदीची संपूर्ण यादी आधीच तयार करा. दिवाळीच्या शॉपिंग लिस्टवर आधारित खरेदी करा.

दिवाळी खरेदीची लिस्ट

  • दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊ बीजच्या पूजेचे साहित्य

  • घर सजावटीच्या वस्तू

  • कपडे आणि भेटवस्तू खरेदी

दिवाळी पूजा साहित्य लिस्ट

  • गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती

  • देवाचे कपडे आणि श्रृंगारचे सामान

  • लहान मोठे मातीचे दिवे

  • कापसाची वात

  • दिवे लावण्यासाठी तेल किंवा तूप

  • तांदूळ, अक्षत, हळद, रांगोळी

  • प्रसादामध्ये गणपतीसाठी लाडू आणि देवी लक्ष्मीसाठी मिठाई

  • फुले आणि पाने

  • चांदीचे नाणे

सजावटीच्या वस्तू

  • रांगोळीसाठी रंग

  • फुले

  • इलेक्ट्रिक लाइट्स

कपडे आणि भेटवस्तू

कुटुंबातील सदस्यांसाठी कपडे, दिवाळी आणि भाऊ बीजसाठी भेटवस्तू, मिठाई, फळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT