Diwali Rangoli Designs esakal
लाइफस्टाइल

Diwali Rangoli Designs : दिवाळीत 'या' सिंपल आणि आकर्षक रांगोळ्या वाढवतील तुमच्या अंगणाची शोभा!

दिवाळीत रांगोळी शिवाय अंगणाला आणि घराला शोभा नाही.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali 2023 : दिवाळी आता अगदी तोंडावर आली आहे. सर्वत्र दिवाळीची लगबग होताना पहायला मिळत आहे. मार्केटमध्ये आकर्षक दिवे, पणत्या, आकाशकंदील, नवे कपडे, फराळाचे पदार्थ, गोड मिठाई इत्यादी गोष्टींची नुसती रेलचेल पहायला मिळत आहे.

आपल्या देशात दिवाळी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीमध्ये ६ दिवस महत्वाचे आणि मुख्य असतात. वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज. या ६ दिवसांमध्ये आपण घरात देवाची छान पूजा करतो. छान रांगोळ्या काढतो.

यंदा दिवाळीमध्ये खास सिंपल आणि सोप्या रांगोळ्या काढण्यासाठी आम्ही काही आयडियाज देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात सिंपल, सुंदर आणि आकर्षक रांगोळीच्या डिझाईन्स.

हॅपी दिवाली रांगोळी डिझाईन

या प्रकारची रांगोळी दिवाळीत हमखास काढली जाते. ही रांगोळी डिझाईन दिसायला ही आकर्षक दिसते आणि ही डिझाईन काढायला देखील सोपी आहे. या रांगोळीची डिझाईन काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फुलाची डिझाईन करून त्याच्या सोबत गोल, चौकोन, आयत किंवा अर्धचंद्र काढू शकता.

मग, त्यात रंग भरून त्यावर Happy Diwali हे नाव काढू शकता. यासोबत तुम्ही विविध पानाफुलांच्या डिझाईनने ही रांगोळी आकर्षक करू शकता.

लक्ष्मीच्या पावलांची डिझाईन

या प्रकारची रांगोळी काढण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो. शिवाय, ही रांगोळी दिसायला ही तितकीच सुंदर दिसते. लक्ष्मीपूजन किंवा धनत्रयोदशीला अंगणात काढण्यासाठी ही रांगोळी बेस्ट आहे.

ही रांगोळी काढण्यासाठी तुम्ही आधी गोल काढून घ्या. त्यात आवडीचा रंग भरून त्यावर रांगोळी छापच्या मदतीने लक्ष्मीची पावले काढा. नंतर, पानाफुलांच्या विविध प्रकारच्या डिझाईनने ही रांगोळी फुलवा. यामध्ये तुम्ही मोरपिसाची देखील डिझाईन काढू शकता.

स्वास्तिक डिझाईन रांगोळी

कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा रोज अंगणात काढण्यासाठी स्वास्तिक अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे, दिवाळीमध्ये खास या प्रकारची स्वास्तिकची रांगोळी तुम्ही काढू शकता. ही रांगोळी काढण्यासाठी फारसा वेळ ही लागत नाही.

अंगणात स्वास्तिक काढून त्यावर आकर्षक रंग भरून त्याच्या बाजूने वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनची बॉर्डर तुम्ही काढू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

SCROLL FOR NEXT