Diwali 2024 Cleaning Tips:  Sakal
लाइफस्टाइल

Diwali 2024 Cleaning Tips: दिवाळीपुर्वी किचनमधील 'हे' 5 कोपरे करा स्वच्छ, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Diwali 2024 Cleaning Tips: दसऱ्यानंतर आता काही दिवसांनी दिवाळी साजरी केली जाणार आहे. यामुळे सर्व घरांमध्ये दिवळीसाठी घराची स्वच्छता सुरू झाली आहे. अनेक लोक फक्त वरवरची स्वच्छता करतात. पण किचनमधील कोपरे स्वच्छ करणे गरजेचे आहे.

पुजा बोनकिले

Diwali 2024 Cleaning Tips: दसऱ्यानंतर काही दिवसांनी दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीत सर्वलोक घराची स्वच्छता करतातआणि सजावट करतात. घरात सर्वात महत्वाचे किचन असते. त्याची स्वच्छ करतांना खास काळजी घेतली पाहिजे. सणासुदीच्या काळात महत्त्वाच्या गोष्टी न मिळाल्यास चिडचिड सुरू होते. स्वयंपाकघर योग्यरित्या स्वच्छ आणि व्यवस्थित करून ठेवल्यास या समस्या येणार नाही. दिवाळी पुर्वी कोणते भाग स्वच्छ करावे हे जाणून घेऊया.

ओव्हन, मायक्रोवेव्ह आणि फ्रिज

दिवाळीत स्वयंपाकात ओव्हन, मायक्रोवेव्ह आणि फ्रिज स्वच्छ करणे गरजेचे असते. कारण त्यात खाद्यपदार्थ बनवले जाते. दिवळीत या गोष्टींचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. ओव्हनमधील आतील भाग पुर्ण स्वच्छ करावा. यासाठी बेकिंग सोडा, लिंबाचा रस वापरू शकता. फ्रिज स्वच्छ करताना त्यातील खराब झालेल्या वस्तू बाहेर काढा. नंतर स्वच्छ करा. नंतर चांगले सामान त्यात भरावे.

स्वयंपाक ओटा

स्वयंपाकाचा ओटा नेहमी स्वच्छ ठेवावा. कारण त्यावर खाद्यपदार्थ बनवले जाते. रोज स्वयंपाक झाल्यावर तुम्ही ओटा स्वच्छ करत असाल पण दिवाळी पुर्वी संपुर्ण ओटा आणि त्यावर ठेवलेले सामान स्वच्छ करा. तेथे असलेले कोपरे स्वच्छ घासून घ्या आणि पुसून घ्या. तुमच्याकडे ग्रेनाइट किंवा इतर गोष्टींचा ओटा असेल तर व्हिनेगर-वॉटर सोल्यूशन वापरू शकता.

स्टोअर रूम

स्टोएररूममध्ये असलेल्या वस्तू बाहेर काढा. तेथे जाळे झाले असेल कर काढून स्वच्छ करा. तसेच काही खराब झालेल्या गोष्टी असेल तर फेकून द्या. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न राहील. तसेच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल.

किचन रॅक

किचनमधील रॅक स्वच्छ करा. यासाठी त्यातील भांडे काढून घ्या. नंतर पाणी आणि व्हिनेगर किंवा भांडे घासायच्या साबणाने स्वच्छ करू शकता. ओल्या कापडाने स्वच्छ झाल्यावर कोरड्या कापडाने स्वच्छ करावे.

किचनमधील ड्रॉवर

किचनमध्ये फर्निचर असेल तर स्वच्छ पाण्याने पुसावे. नंतर कोरड्या कापण्याने स्वच्छ पुसावे. यासाठी कॉटन किंवा नरम कापडाचा वापर करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT