Diwali Cleaning Tips Sakal
लाइफस्टाइल

Diwali Cleaning Tips: घरातील अस्वच्छ पडदे न धुताही होतील स्वच्छ, फक्त करा 'हे' सोपे काम

Diwali Cleaning Tips: नवरात्रीत अनेक लोकांनी घराची स्वच्छता केली असेल आता काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. यासाठी घराताल पडद्याची पुन्हा स्वच्छता करायची असेल तर न धुता करू शकता. यासाठी कोणत्या हॅक्स वापरू शकता हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Diwali Cleaning Tips: शारदीय नवरात्री ३ ऑक्टोपासून सुरू झाली आहे. अनेक लोकांनी घराची स्वच्छता केली आहे. आता नवरात्रीनंतर दिवाळी येणार आहे. दिवाळीची तयारी आधीच सुरू होते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात साचलेली धुळ स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या पद्धतीचा वापर करू शकता. तुम्ही काहीही म्हणा साफसफाईचे काम खूप कंटाळवाणे असते. पण काही सोपे हॅक्स आहेत जे तुमचे काम थोडे सोपे करू शकतात. घरातील पदडे न धुता देखील स्वच्छ करता येतात.

स्टीम क्लीनिंग करावे

तुम्हाला पडदे धुवायचे नसतील तर स्टीम क्लींनिगची मदत घेऊ शकता. यासाठी व्हॅक्यूम क्लिनरने पडद्यावरची धुळ कमी करता येते. तसेच कुठे डाग असेल तर ते कमी होते. स्टीम क्लिनिंग करण्यासाठी स्टीमरमध्ये थोडे पांढरे व्हिनेगर टाका आणि नंतर पडद्याचा डाग असलेला भाग पूर्णपणे स्टीम करून स्वच्छ करा.

उन्हात वाळवावे

तुम्ही पडदे उन्हात ठेऊ शकता. यामुळे पडदे स्वच्छ दिसतात. घरातील पडदे ३ते ४ तास उन्हात ठेवावे. यामुले पडद्यावरचे बॅक्टेरिया कमी होतात. तसेच दुर्गंधी देखील कमी होते. ही सर्वात सोपी पद्धत असून कमी वेळेत पडदे स्वच्छ होतात.

धुळ झटकावी

घरातील दार आणि खिडक्यांवर असलेले पडदे स्वच्छ करण्यासाठी काठी किंवा व्हॅक्युम क्लिनरचा वापर करू शकता. यामुळे पडद्यावरची धुळ आणि जाळे कमी होतात. तसेच पडदे नव्यासारखे चमकू लागतात. या हॅकमुळे तुमचे काम सोपे होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह, पत्नीचे महासंचालकांवर गंभीर आरोप; पोलिसात दाखल केली तक्रार

Latest Live Updates Marathi: पुण्यासह राज्यभरात पाणीटंचाईचं संकट दूर होऊन भरभरून पाऊस पडावा यासाठी पुण्यात प्रजन्ययागाचे आयोजन

World Blood Donor Day 2026: शाकाहारी लोक रक्तदान करू शकत नाहीत? रक्तदानाबद्दलचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

छोट्या पडद्यावर परतणार शिव आणि गौरीची हिट जोडी; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश; 'या' मालिकेत दिसणार

Fifa World Cup 2026: ब्राझीलने पराभव टाळला, स्कॉटलंड ३६ वर्षांनंतर जिंकला; कतार-स्वित्झर्लंड सामन्यात वाद झाला

SCROLL FOR NEXT