लाइफस्टाइल

Diwali Cleaning Tips 2022 : दिवाळीमध्ये न थकता या टीप्स वापरून किचन स्वच्छ करा

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीचा सण जवळ आला आहे. म्हणता म्हणता आता दिवाळी सुरू होईल; दिवाळीत घराच्या सजावटीबरोबरच त्याची स्वच्छताही खूप महत्त्वाची असते आणि सण म्हटला की घराची साफसफाई ही आलीच; पण पूर्ण घर साफ करायचं म्हटलं तर मनात वेगळीच धडकी भरते. काय करावं कसं करावं कुठून सुरुवात करावी खूप प्रश्न पडतात.

लहानपणी आई आपल्याला हाती घेऊन सगळ घर साफ करून घ्यायची. पण सगळ्यात भीतीदायक आणि दमवणारी जर कोणती जागा असेल तर ती किचन. बाकी कोणतीही खोली साफ करणं तेवढं कठीण नसत पण किचन सांभाळणं म्हणजे खूप कष्टी काम.किचन ओट्याच्या भिंतीला लागलेले तेलाचे डाग, धुळीमुळे खराब झालेले डब्यांची झाकणं, हे सगळ स्वच्छ करणं खूप कठीण असतं. पण या टीप्स वापरून तुम्ही हे काम अगदी सोप्पं करू शकतात.

१. मीठ

मीठ खाण्याव्यतिरिक्त ते चिकट डाग स्वच्छ करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. स्वयंपाक करताना टाइल्सवर तेल आणि मसाले सांडतात, ते स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात दोन ते तीन चमचे मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा घाल. आता या पाण्याने टाइल्स स्वच्छ करा.

२. व्हिनेगर

स्वच्छतेसाठी व्हिनेगर हा देखील अतिशय प्रभावी उपाय आहे. आपल्या घरात सहज पणे जे मिळू देखील शकत आणि जरी नसेल तरी बाजारातून लगेच विकत आज शकतात. स्वयंपाकघर चकाचक करण्यासाठी, एका भांड्यात व्हिनेगर घ्या आणि कोणतेही स्वच्छ कापड त्यात भिजवा आणि ते पिळून घ्या, त्यानंतर भिंतीवरील हट्टी डाग घासून पुसा.

३. बेकिंग सोडा

किचन टाइल्स स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी कोमट पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा. आता त्यात स्वच्छ कापड बुडवा आणि त्यानंतर टाइल्स आणि भिंती स्वच्छ करा.

४. लिंबू आणि सोडा

हट्टी डाग आणि चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबू हा सर्वात प्रभावी उपाय आहे. सर्वात आधी या भिंती स्वच्छ पुसून घ्या. आता एका भांड्यात लिंबाचा रस काढून त्यात थोडा सोडा घाला. कोरडे स्वच्छ कापड ह्यात भिजवून किचन साफ करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

Ghatkopar Hoarding Collapse : सरकार, महापालिकेवर गुन्हा दाखल करा;नाना पटोले, मुंबईतील होर्डिंगमाफियांना संरक्षण

Rishabh Pant : 'जर मी शेवटच्या सामन्यात खेळलो असतो तर...' लखनौवरील विजयानंतर ऋषभ पंतचं प्लेऑफबाबत मोठं वक्तव्य

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; अमेरिकन बाजारात वाढ, कोणते शेअर्स तेजीत?

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकाराला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी!

SCROLL FOR NEXT