

How Much Money to Break Corporators BJP Asks
Esakal
Maharashtra Politics: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आचारसंहिता लागू झाली आहे. आता युती आघाडीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मुंबईत ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे. यावरून भाजपने जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधीही होवो, त्याचा काहीही परिणाम होणार नाही असं भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट होत आहे. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.