Hair  sakal
लाइफस्टाइल

Hair Care: प्रदुषणामुळे तुमचे केस खराब झाले आहेत का? ‘अशी’ घ्या काळजी

शहरांमधील वायू प्रदूषणामुळे आपल्या केसांना हानी पोहोचते आणि आपल्या टाळूवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.

Aishwarya Musale

आपल्या सर्वांना सुंदर केस हवे असतात आणि यासाठी तुम्हाला बाजारात अनेक उत्पादने सहज मिळतील. प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. दिवाळीच्या सणामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते आणि या प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होते आणि कोरडेपणा वाढतो.

केसांची काळजी घेण्यासाठी केसांचा प्रकार जाणून घेणे खूप गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया प्रदूषणामुळे खराब झालेल्या केसांना नवजीवन देण्यासाठी घरात असलेल्या कोणत्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो आणि जाणून घेऊया त्यांच्यामुळे केसांना होणारे फायदे.

या गोष्टींचा करा वापर

एलोवेरा जेल

खोबरेल तेल

केसांसाठी खोबरेल तेलाचे काय फायदे आहेत?

खोबरेल तेलामध्ये असलेले अँटी फंगल तत्व केसांना कोंड्याच्या समस्येपासून वाचवते.

खोबरेल तेल केसांच्या वाढीस मदत करते.

केसांना खोबरेल तेल लावल्यास काय होते?

एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी असते ज्यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते.

यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म केसांना हायड्रेट करण्यास मदत करतात.

एलोवेरा जेलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केसांना सर्व प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात.

खराब झालेल्या केसांसाठी काय करावे?

सर्वप्रथम केसांच्या लांबीनुसार एका भांड्यात ३ ते ४ चमचे खोबरेल तेल टाका.

यामध्ये तुम्ही एलोवेरा जेल टाका.

या दोन गोष्टी नीट मिसळा आणि टाळूपासून केसांच्या लांबीपर्यंत लावा.

केसांना हेअर पॅक लावण्यासाठी तुम्ही ब्रश वापरू शकता.

साधारण १ ते २ तास केसांवर तसंच राहू द्या.

यानंतर केस पाण्याने धुवा आणि शॅम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने केस व्यवस्थित स्वच्छ करा.

हा घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा केसांवर करू शकता.

त्याचा सतत वापर केल्याने तुमच्या निर्जीव केसांमध्ये नवीन चमक दिसू लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

El Nino Impact: अल निनोच्या कमी पावसाने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरातील भातशेती कोलमडली; ३०-४० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज

DCM Sunetra Pawar : हारतुरे नको...मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा

SCROLL FOR NEXT