लाइफस्टाइल

DIY: केस गळती पासून मुक्तता मिळवायची आहे?

अर्चना बनगे

कोल्हापूर: केस गळती (hair fall) सुरू झाली की आपण प्रचंड अस्वस्थ होतो. अशा वेळी आपण घरगुतीच एक चांगला उपाय करू शकतो. सर्वांच्याच घरामध्ये असलेल्या उडीद डाळी(urad dal) पासून हेयर मास्क (hair mask)तयार करून सहजपणे केस गळतीची समस्या सहजपणे कमी करू शकतो.

अनेक पोषक तत्वांनी युक्त असलेल्या उडीद डाळीमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. मात्र हीच उडीद डाळ आपले सौंदर्य खुलवण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त ठरते. प्रोटिन, खनिज आणि व्हिटॅमिन अशा तत्त्वांनी भरपूर असलेली ही डाळ जर आपण योग्य पद्धतीने आपल्या केसांसाठी वापरली तर केस अधिक मजबूत आणि चमकदार होतात. एवढेच नव्हे तर या पासून तयार केलेल्या हेअर मास्क मुळे केस गळतीची समस्या कमी होऊन जाते.उडीद डाळ आपल्या केसांच्या वाढीला पोषक ठरते. त्याचबरोबर केस तुटणे किंवा केसांचे विभाजन होणे अशा समस्या थांबवते. आपण या ठिकाणी आपल्या केसांच्या उपयुक्तते साठी ही डाळ कशी फायदेशीर ठरते याबाबत माहिती घेऊया.

उडीद डाळीचे केसासाठी फायदे

उडीद डाळीमध्ये विटामिन, प्रोटीन आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असते. यामुळे केसांना पोषक असे अनेक घटक मिळतात. केसांना योग्य पोषक तत्व मिळाल्यामुळे केस गळण्याचे थांबते या पासून तयार केलेले हेअर मास्क केसांच्या स्काल्प ला मऊपणा प्रदान करते त्याचबरोबर केसांना चमकदार बनवते. उडीद डाळ उकळून त्याची पेस्ट तयार करून रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावावे आणि मसाज करावे. रात्रभर ही पेस्ट अशीच ठेवावी यामुळे काही दिवसात नवीन केस उगवण्यासाठी प्रारंभ होते.

उडीद डाळ आणि दही चे हेअर मास्क

आवश्यक साहित्य

उडीद डाळ एक कप, दही अर्धा कप.

बनविण्याची पद्धत

हेयर मास्क तयार करण्यासाठी उडीद डाळ रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. व त्याची पेस्ट करा. त्यानंतर त्यामध्ये दही मिसळा. दही व डाळीची पेस्ट चांगल्या पद्धतीने मिक्स करून ते हेअर मास्क म्हणून आपण वापरू शकतो.

वापरण्याची पद्धत

आपले केस दोन भागांमध्ये विभाजित करा. हेयर मास्क केस आणि स्काल्पला चांगल्या पद्धतीने मसाज करत लावा. हे हेअर मास्क केसावर कमीत कमी अर्धा तास ठेवा. केस शॉवर कॅपने झाकून घ्या. अर्ध्या तासानंतर शाम्पू लावून केस धुवा. या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून एक वेळ कमीत कमी दोन महिने करा. काही दिवसातच तुमच्या केसांची गळती थांबेल.

उडीद डाळ आणि मेथी हेअर मास्क

हा पॅक केसांना पोषक तत्व तर देतोच त्याचबरोबर केसांच्या मुळांना ही आवश्यक असणारे घटक यातून मिळतात. यामुळे केस गळण्या पासून वाचतात व मजबूत होतात.

आवश्यक साहित्य

उडीद डाळ दोन मोठे चमचे

अंडी एक

जास्वंदीचे फूल आणि पाने आठ ते दहा

लिंबूचे रस चार चमचे

मेथीच्या बिया एक मोठा चमचा

बनवण्याची पद्धत

उडीद डाळ आणि मेथी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी भिजवलेली डाळ आणि मेथी बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये जास्वंदीचे फूल आणि पाने चांगल्या पद्धतीने मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. अंड्यातील पांढरा हिस्सा बाजूला करा आणि तो पेस्टमध्ये मिसळा. लिंबूचा रस त्यामध्ये घालून मिश्रण करा आणि हेअर मास्क म्हणून त्याचा वापर करा.

वापरण्याची पद्धत

हेअर मास्क चांगल्या पद्धतीने केसांना लावा. केस शॉवर कॅपणे झाका. एक तासानंतर शाम्पूने केस धुवा यावेळी कंडिशनरचा वापर करू नका. हेअर मास्क आठवड्यातून एक वेळा वापरू शकता. यामुळे केस गळण्याचे लवकरच थांबतील आणि नवीन केसांचा विकास होईल.

हे हेअर मास्क पूर्णपणे नैसर्गिक आहे. परंतु केसांशी संबंधित काही समस्या असतील तर ते वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT