Kitchen Hacks sakal
लाइफस्टाइल

Kitchen Hacks : चुकूनही लोखंडाच्या कढईत बनवू नका हे पदार्थ, फायद्याऐवजी नुकसानच होईल जास्त

लोखंडी कढईत चुकूनही शिजवू नका हे 5 पदार्थ, नाहीतर...

Aishwarya Musale

पूर्वीच्या काळी लोक लोखंडी भांड्यात भाजीपाला आणि अन्न शिजवायचे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे लोखंडी कढईतील अन्न अतिशय चविष्ट बनते, तसेच त्यामध्ये तयार केलेले अन्न आरोग्यासाठी अनेक फायदे देते.

आजही अनेकजण लोखंडी कढई रोजच्या स्वयंपाकासाठी वापरतात. पण तुम्हाला माहितीये काही पदार्थ लोखंडी कढईत अजिबात शिजवू नये. लोखंडी कढईत हे पाच पदार्थ शिजवणं तुम्हाला किती महागात पडू शकतं माहितीये?

टोमॅटो - टोमॅटो नॅचरली अॅसिडिक असते. त्यामुळे ते लोखंडी कढईत शिजवल्यावर लोखंडाशी त्याची रिअॅक्शन होऊन पदार्थाची चव बिघडते.

पालक - पालकमधे ऑक्सॅलिक ऍसिड मुबलक प्रमाणात असते आणि जेव्हा ते लोखंडी पॅनमध्ये शिजवले जाते तेव्हा ते खराब होते तशीच काळी पडते. हे ऑक्सॅलिक ऍसिडसह लोखंडाच्या झालेल्या रिअॅक्शनमुळे होते. यामुळे जेवणाची चवही बिघडू शकते.

अंडी - बहुतेक लोक लोखंडी कढईत ऑम्लेट बनवतात. पण ऑम्लेट कधीही लोखंडी कढईत बनवू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

ऑम्लेट किंवा इतर अंड्याचे पदार्थ बनवताना ते लोखंडी तव्याला किंवा कढईला चिकटलेले असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. म्हणूनच ऑम्लेट बनवण्यासाठी तुम्ही फक्त नॉन-स्टिक पॅन वापरा.

मासे - लोखंडी कढईत मासे तळल्याने किंवा शिजवल्याने अनेक नुकसान होते. मासे उष्णतेमुळे लोखंडी तव्याला चिकटतात. तेल किंवा बटर लावले तरी ते तव्याला चिकटून राहते आणि हा मासा तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT