earthquake
लाइफस्टाइल

भूकंपाचे हादरे जाणवल्यास घाबरू नका, अशी 'घ्या' खबरदारी

पण भविष्यात कधी मोठा धक्का बसलाच तर त्यासाठी नागरिकांनी तयार असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, अशावेळी घाबरून न जाता काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव जिल्ह्यात अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. नुकतेच नागपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. हे धक्के अगदीच सौम्य असल्याने त्याचा कुठलाही परिणाम नागरिकांवर झाला नाही. पण भविष्यात कधी मोठा धक्का बसलाच तर त्यासाठी नागरिकांनी तयार असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, अशावेळी घाबरून न जाता काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कसे होते भूकंपाचे मापन?

भूकंपाची तीव्रता ही प्रामुख्याने ‘रिश्टर स्केल’ या एककात मापली जाते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रात त्याची नोंद केली जाते. या रिश्टर स्केलचे एक ते दहा असे गट पडतात. सिस्मोग्राफद्वारे त्याचे मापन केले जाते.

१.९ रिश्टर स्केल एवढा भूकंप केवळ सिस्मोग्राफद्वारे शोधला जाऊ शकतो.

२.९ - केवळ लटकलेल्या गोष्टी हलताना दिसतात.

३.९ - दरम्यान हादरे जाणवू लागतात.

४.९ - धक्के प्रत्येकाला जाणवतात. छोट्या वस्तु तुटण्याची शक्यता असते.

५.९- वस्तू जागेवरून हलतात. भिंतीला तडे जाऊ शकतात

६.६९ - इमारतींना तडे पडू शकतात.

७.९ - इमारती कोसळू शकतात आणि जमिनीला भेगा पडू शकतात.

८.९ - मोठ्या प्रमाणावर विनाश होऊ शकतो.

९ - अशी तीव्रता असल्यास जमिनीला मोठे हादरे बसून जमीन फाटते

घराबाहेर असाल तर...

भूकंपादरम्यान घराबाहेर असाल तर, त्या जागेवरून कुठेही हलू नका. मात्र, इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.

मोकळ्या जागेवर असाल, तर धक्के कमी होईपर्यंत तिथेच थांबा. भूकंपात बऱ्याचदा भिंती कोसळतात, काचा फुटतात, वस्तू पडतात असे आढळून आले आहे.

चालत्या वाहनात असाल तर...

सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि वाहनाच्या आत थांबा. मात्र, इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका.

भूकंप थांबल्यानंतर हळूहळू वाहन सुरू करा. भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरून जाणे टाळा.

घरी असाल तर जमिनीवर बसा

आतल्या दाराची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबावे. काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा. भूकंप आल्यानंतर लोक बाहेर पडून इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतानाच जखमी होतात असे अनेक संशोधनाअंती आढळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT