लाइफस्टाइल

केळीच्या साली टाकाऊ म्हणून फेकू नका; वाचा काय आहेत फायदे?

या सालींच्या पुर्नरवापराने आरोग्याला काही महत्वाचे घटक मिळू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

केळ हे अनेकांचा आवडते फळ आहे. मात्र बऱ्याचवेळा वजन वाढते म्हणून अनेकजण केळ खाणे टाळतात. कित्येकदा भाज्या किंवा काही फळे खाल्ल्यावर आपण त्यांच्या साली कचरा म्हणून फेकून देतो. कारण त्याचे फायदे माहीत नसल्याने आपण त्यांना कचरा म्हणून फेकून देतो. मात्र काही फळांच्या साली या उपयुक्त असतात. त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वे असतात.

या सालींच्या पुर्नरवापराने आरोग्याला काही महत्वाचे घटक मिळू शकतात. केळीमुळे आरोग्य चांगले राहते आणि वजनही नियंत्रित राहते. याच केळाची साल आपण फेकून देतो मात्र ही साल त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते. आज या लेखात आपण केळीच्या सालीच्या वापराविषयी जाणून घेणार आहोत. केळाच्या सालीचा वापर कसा करावा आणि त्याचे कोणते फायदे आहेत हे पाहणार आहोत...

केळीच्या सालीचे फायदे :

  • केळीच्या सालीचा वापराने आरोग्याच्या समस्या दूर होतात. या सालीत फायबरचे अधिक असते. याशिवाय अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाणही असते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे केळ शरीरासाठी आणि साल त्वचेसाठी दोन्ही खूप फायदेशीर आहेत.

  • केळीची साल दातांसाठी खूप चांगली असते. त्यामुळे दात पांढरे आणि चमकदार होण्यास मदत होते. त्याचे तुकडे दातांवर चोळल्याने ते मजबूत आणि चमकदार होतात. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असते.

  • केळीची साल पचनासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. केळाची साल चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे काम करते. तुम्हाला फक्त त्याची साल मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. यात २ चमचे बदामाचे तेल मिक्स करून पॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावायचे आहे. त्यानंतर 20 मिनिटांनी धुवा. असे केल्याने तुम्हाला काही दिवसातच परिणाम दिसू लागतील.

  • केळ्याची सालही नैराश्य कमी करते. हे मेंदूतील आनंदी हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे काम करते. यासोबतच चेहऱ्यावर येणारे पिंपल्सही रोखतात. त्यात फिनोलिक असते, जे अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

Man in burqa mumbai local Video : मुंबई लोकल ट्रेनच्या महिला डब्यात बुरखा घालून घुसला पुरूष अन् मग...

Solapur News : लग्नास नकारानंतर तरुणाने संपविले जीवन; मुलीला समोर बसून विचारण्याची केली होती विनवणी

T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध संकटमोचक ठरलेल्या कर्णधार सू्र्यकुमारचा मोठा विक्रम; विराट कोहली, बाबर आझमला टाकलं मागे

SCROLL FOR NEXT