Daily Routine esakal
लाइफस्टाइल

Daily Routine : रूटीनमध्ये फक्त हा एक बदल करा; हृदय अन् यकृत कायम राहील निरोगी,वाचा डॉक्टरांचा सल्ला

या आजारांपैकी फॅटी लिव्हर हा सर्वात सामान्य आजार आहे. त्याच वेळी, यकृत सिरोसिस, हेपेटायटिससारखे इतर रोग आहेत जे धोकादायक आहेत.

साक्षी राऊत

Daily Routine : हृदयाप्रमाणेच किडनी, यकृत हे देखील आपल्या शरीराचे महत्त्वाचे अंग आहेत. दीर्घायुष्य जगण्यासाठी तुमचे यकृत योग्यरित्या कार्य करणे महत्वाचे आहे. अन्यथा तुम्ही अनेक गंभीर आजारांना निमंत्रण द्याल. या आजारांपैकी फॅटी लिव्हर हा सर्वात सामान्य आजार आहे. त्याच वेळी, यकृत सिरोसिस, हेपेटायटिससारखे इतर रोग आहेत जे धोकादायक आहेत.

तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यामध्ये विविध प्रकारचे पेय यकृताला डिटॉक्स करण्यासाठी पिण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते विक्रती ज्यूस तुमच्या किडनीला हानी पोहोचवू शकतात. यकृत स्वतः एक डिटॉक्सिफायिंग अवयव आहे, म्हणून त्याला अशा प्रकारे डिटॉक्स करण्याची आवश्यकता नाही. चला तर आज आपण अशी एक सोपी ट्रिक जाणून घेऊया ज्याद्वारे तुम्ही यकृत निरोगी ठेवू शकता.

Daily Routine

ही ट्रिक वापरा

बॅड लाइफस्टाइल आणि जंक फूडमुळे लोकांमध्ये यकृताचे आजार खूप सामान्य झाले आहेत. यकृताशी संबंधित अनेक समस्या विशेषतः लहान मुलांमध्ये दिसून येतात. केरळचे यकृत रोग विशेषज्ञ डॉ एबी फिलिप यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे.

यानुसार जर तुम्ही आठवड्यातून 150 मिनिटे चालले तर तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून बऱ्याच अंशी आराम मिळेल. जर तुम्हाला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या समस्येशी लढण्यासाठी, डॉक्टर प्रथम अल्कोहोल सोडण्याची शिफारस करतात.

ब्रिस्क वॉक म्हणजे काय?

साधारणपणे असे मानले जाते की वेगवान चालण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटात 100 पावले चालावे लागतात. हा वेग एका तासात जवळपास ३.५ मैल असावा. यासाठी तुमचा चालण्याचा वेग अगदीच फास्ट असावा. ज्यात तुम्हाला बोलता येऊ शकेल पण गाता येणार नाही. (Heart Health)

वेगवान चालण्याचे अनेक फायदे

रोज ब्रिस्क वॉक केल्याने तुम्ही अनेक गंभीर आजार टाळू शकता. हृदयरोग तज्ज्ञांनी हृदयविकार टाळण्यासाठी दररोज 45 मिनिटे वेगाने चालण्याचा सल्ला दिला आहे. टाइप 2 मधुमेह टाळण्यासाठीसुद्धा हा प्रभावी उपाय आहे. एवढेच नाही तर रोज ब्रिस्क वॉक करून चरबीही कमी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT