Yoga sakal
लाइफस्टाइल

Yoga for Skin: निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी करा ही चार योगासने

तुम्हाला माहित आहे का की अशी अनेक योगासने आहेत ज्यामुळे त्वचा चमकदार, तरुण आणि निरोगी बनते.

Aishwarya Musale

योगामुळे स्ट्रेस किंवा टेंशन कमी होते आणि शरीरात लवचिकताही येते. पण तुम्हाला माहित आहे का की अशी अनेक योगासने आहेत ज्यामुळे त्वचा चमकदार, तरुण आणि निरोगी बनते. दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो, ज्याद्वारे लोकांना योग करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो.

या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला त्या योगासनांबद्दल सांगणार आहोत जे तुमची त्वचा आतून निरोगी बनवतील. यासोबतच शरीराला इतरही अनेक फायदे मिळतील. आजपासूनच करा ही 5 योगासने, ज्याच्या मदतीने तुमचा चेहरा चमकदार आणि निरोगी होऊ शकतो.

धनुरासन

हा योग नियमित केल्यास पोटच नाही तर त्वचाही निरोगी राहते. हे आपले शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. धनुरासन केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूही मजबूत होतात. जर तुम्ही दररोज असे केले तर ते निरोगी चमक देते आणि त्वचेची दुरुस्ती देखील करते.

पश्चिमोत्तनासन

हे योगासन केल्याने पाठीचा कणा, खांदे आणि पाय यांचे स्नायू मजबूत होतात. असे केल्याने खालच्या भागातील दुखण्यापासून आराम मिळतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. खराब पचनामुळे चेहऱ्याची चमक हिरावू लागते, पण हे आसन रोज केल्यास चेहरा नैसर्गिकरित्या चमकू शकतो.

अधोमुखश्वासन

जर शरीरात रक्त व्यवस्थित वाहत नसेल तर त्याचा परिणाम आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही दिसून येतो. चेहऱ्यावर डाग आणि काळेपणा जमा होऊ लागतो. अधोमुखवासन आसन केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरासोबतच त्वचाही चांगली राहते.

भुजंगासन

या योगास कोब्रा पोज असेही म्हणतात, जे केल्याने खांद्यावर आणि पाठीचा ताण दूर होतो. यामुळे आपल्या शरीराला आराम वाटतो. मूड ठीक असेल तर त्वचाही फ्रेश राहते आणि चमकही येते.

बालासना

बालासन केल्याने छातीतील वेदना तर दूर होतातच पण चांगली झोपही लागते. आपल्या सर्वांना माहित आहे की पुरेशी झोप घेतल्याने त्वचा चमकदार होते आणि ती निरोगी राहते. त्वचेला जास्त काळ तरुण ठेवायचे असेल तर रोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. यासाठी रोज बालासन करायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT