Tickling sakal
लाइफस्टाइल

Side Effects Of Tickling: बाळाला हसवण्यासाठी तुम्ही गुदगुल्या करता का? थांबा असं करणं ठरू शकतं घातक

पोटावर किंवा तळपायाला गुदगुल्या केल्या, की बाळं लगेचच अगदी खदखदून हसतात.

Aishwarya Musale

बाळाला खूश करण्यासाठी पालक अनेकदा त्याला गुदगुल्या करताना दिसतात. तुम्हीही नवजात बाळाला हसण्यासाठी अनेकदा गुदगुल्या केल्या असतील. पोटावर किंवा तळपायाला गुदगुल्या केल्या, की बाळं लगेचच अगदी खदखदून हसतात; पण त्या गुदगुल्यांचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तरी बाळांच्या हसण्याचं रूपांतर रडण्यात कधी होतं, ते कळतही नाही.

त्याचं कारण त्या गुदगुल्या त्यांना वेदनादायी ठरतात. वास्तविक गुदगुल्या जास्त प्रमाणात केल्या तर बाळांसाठी घातकही ठरू शकतं.पण तुम्हाला माहीत आहे का की असे करून तुम्ही तुमच्या मुलाचे नुकसान करत आहात?

गुदगुल्याचे दोन प्रकार आहेत. पहिले निस्मेसिस आणि दुसरे गार्गलेसिस. एखाद्या व्यक्तीच्या हलक्या स्पर्शामुळे निस्मेसिस गुदगुल्या होतात. त्यावर तुम्हाला हसायला येत नाही. गार्गलेसिसमध्ये असताना व्यक्ती मोठ्याने हसते.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, बाळाला गुदगुल्या करताना वेदना जाणवू शकतात. आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये गुदगुल्या होऊन मृत्यू झाला आहे.

छाती आणि पोटात वेदना होतात

लहान मुलांना हल्की-फुल्की गुदगुदी करणे हानिकारक ठरणार नाही. जर तुम्ही त्याला खूप फास्ट गुदगुल्या केल्या तर त्याचे नुकसान होऊ शकते. त्याला वेदना जाणवू शकतात. मुले लहान असल्याने त्यांना त्यांच्या समस्या सांगता येत नाहीत. त्यांना गुदगुल्या दरम्यान छाती आणि पोटात अस्वस्थता असू शकते.

उचकी येऊ लागते

एवढेच नाही तर बाळांना जास्त गुदगुल्या केल्याने उचकी येऊ शकते. त्यामुळे तो चिडून रडू लागतो. गुदगुल्या झाल्यामुळे त्यांच्या अवयवांना जोरदार धक्का बसतो. त्यांना बाह्य आणि अंतर्गत अवयवांना दुखापत होऊ शकतात. मुलांना त्यांच्या समस्या बोलून दाखवता येत नाहीत. म्हणूनच पालकांनी त्यांच्यासोबत असे करणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT