लाइफस्टाइल

रात्री शांत झोप हवी असेल तर 'या' गोष्टी नक्की करा!

सकाळ डिजिटल टीम

सर्व प्रकारच्या रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी रोज सात ते आठ तास झोपण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका जास्त असतो. झोप न लागल्यामुळे तणाव, चिंता यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार सारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जीवनशैलीत असलेल्या बदलांमुळे झोपेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आयुर्वेदाच्या मदतीने घरच्या घरी सहज बरे करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यासाठी झोपण्याआधी या कृती करणे गरजेचे आहे.

झोपण्यापूर्वी मालिश करा- अभ्यंग हे आयुर्वेदाचे एक रूप आहे. यात औषधी वनस्पतींचा अर्क गरम करून त्या तेलाने शरीराची मालिश केली जाते. जर पूर्ण शरीराचे मालिश करणे शक्य नसेल तर जिथे तणाव जाणवत आहे तिथे मालिश करा. तुमच्या कपाळावर आणि खांद्यावर थोडे गरम तिळाचे तेल लावा. तुमच्या स्नायूंना आराम देण्यासाठी आणि शांत झोपण्यासाठी त्यांना व्यवस्थित मालिश करा. यामुळे शांत झोप लागेल.
झोपण्यापूर्वी पाय धुवा- जुन्या काळातील लोकं दिवसभर काम करून घरी आल्यानंतर झोपण्याआधी पाय धुत असत. पाय धुतल्यामुळे शरीर आणि तणावग्रस्त स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे तणावाची पातळी कमी होते. आयुर्वेदिक चिकित्सक सांगतात की, पाय धुतल्याने नकारात्मदता दूर होऊन तुम्हाला शांतता मिळते. मन शांत झाल्यामुळे झोप सहज येते.
प्राणायामाचा फायदा - प्राणायामामध्ये संथ श्वासोच्छवास घेताना आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो. ज्यामुळे संपूर्ण शरीरात ऊर्जा प्रवाह मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी प्राणायाम केल्यास रक्ताभिसरण सुधारण्यास आणि शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढण्यास मदत होते. तुमचे मन शांत करण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यास उपयुक्त ठरू शकते.
फोन, टॅब्लेटला ठेवा दूर - इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर हा आपल्या आधुनिक जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. फोन, टॅब्लेट झोपण्यात व्यत्यय आणतो. झोपण्यापूर्वी फोन किंवा टीव्ही पाहिल्यामुळे तुमचे मन सक्रिय राहते, ज्यामुळे तुम्हाला झोप लागणे कठीण होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आरामदायी संगीत ऐका किंवा शांत झोपण्यासाठी एखादे पुस्तक वाचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT