Low Back Pain Sakal
लाइफस्टाइल

Low Back Pain: जर पाठदुखीमुळे चालणे कठीण झाले असेल तर या टिप्सची घ्या मदत

Low back pain: कंबर आणि पाठदुखीची समस्या कमी करण्यासाठी फिजिओथेरेपी महत्वाची भूमिका बजावते.

Puja Bonkile

Low Back Pain: अनेक लोकांना एकसारखे ऑफिसमध्ये बसून काम केल्याने पाठदुखी आणि मणक्याच्या खालच्या भागात वेदना होतात. यात सौम्य वेदना, तीव्र वेदना जाणवते. पॅथॉलॉजीशी संबंधित कारणांव्यतिरिक्त, संधिवात, स्नायूंचा ताण आणि डिस्कचे नुकसान यामुळे देखील पाठदुखी जाणवते. जीवनशैलीशी संबंधित अनेक कारणांमुळे कंबर आणि पाठदुखीची समस्या देखील वाढू शकते. या कारणांपैकी लठ्ठपणा, व्यायाम न करण्याची सवय आणि अस्वस्थ जीवनशैली ही देखील पाठदुखीची प्रमुख कारणे असू शकतात.

डॉ. अपिरेड्डीगरी हरिथा यांनी हेल्थ साइटला दिलेल्या माहितीनुसार एकाच जागी बसूण काम केल्याने किंवा चुकीची बसण्याची पद्धत यामुळे कंबर आणि पाठदुखी वाढू शकते. चुकीची झोपण्याची पद्धत, चुकीच्या पद्धतीने उभे राहणे, झोप न लागणे आणि अयोग्य पलंग यांसारखी कारणेही तुमच्या पाठदुखीच कारण असू शकते. अनेक लोक अनेक तास डेस्कवर बसून काम करतात. चालण्याचे प्रमाण कमी असतात. तुम्ही जड वस्तू उचलत असाल तर पाठदुखी होऊ शकते.तुम्ही शूज अयोग्य आकाराचे किंवा अयोग्य पद्धतीचे असल्यास, यामुळे पाठदुखी होऊ शकते. गर्भधारणा, मासिक पाळीत क्रॅम्प आणि बॅक लेबरमुळे देखील पाठदुखी होऊ शकते.

पाठदुखीचा परिणाम कामावर होतो

तज्ज्ञांच्या मते, “पाठदुखीमुळे तुम्हाला दैनंदिन जीवनातील कामे करण्यातही समस्या येऊ शकतात. यामुळे लोकांना खाली पडलेल्या वस्तू उचलणे किंवा बसणे यांसारख्या गोष्टी करणे कठीण होऊ शकते. पाठदुखीची तीव्र समस्या तणाव, चिंता आणि नैराश्य देखील वाढवू शकते. तसेच पाठदुखीमुळे, अनेक काम करणाऱ्या लोकांना कामातून रजा घेणे आणि काम करण्यास सक्षम होण्यात अडचणी येतात. "यामुळे आरोग्यसेवा खर्च वाढतो आणि लोकांची कार्यक्षमता देखील कमी होते."

पाठदुखीवर उपाय कोणते आहेत?

फिजिओथेरपी

कंबरदुखी आणि कंबरदुखी कमी करण्यासाठी फिजिओथेरपीची मदत घेता येते.

एरोबिक्स व्यायाम

वेदना कमी करण्यासाठी, आपण एरोबिक्सचा सराव करू शकता. फिटनेस वाढवण्यासोबतच पाठ आणि कंबर दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासही मदत होते.

योगा

योगा, व्यायाम आणि इतर प्रकारचे व्यायाम करावे. ज्यामुळे लवचिकता वाढते.

चांगली झोप येण्यासाठी सपाट आणि आरामदायी गादी आणि उशी वापरावी.

दिवसातून 2-3 लिटर पाणी प्यावे. यामुळे तुम्हाला डीहायड्रेशनची समस्या जाणवणार नाही. यामुळे नसा आणि स्नायूंना आराम मिळेल आणि वेदना कमी होतील.

पोषक घटकांचा समावेश असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT