Jeans Cleaning Tips sakal
लाइफस्टाइल

Jeans Cleaning Tips : जीन्स धुताना करू नका ‘या’ चार चुका; नाहीतर कपड्यांची चमक होईल कमी...

आपली आवडती जीन्स अधिक काळ टिकावी, चांगली फ्रेश दिसावी म्हणून ती धुताना मात्र थोडी काळजी घेतली पाहिजे आणि काही चुका टाळल्या पाहिजेत.

सकाळ डिजिटल टीम

कुर्ता असो, टॉप असो किंवा मग टी- शर्ट असो... सगळ्यांवर अगदी परफेक्ट मॅच होते ती आपली जीन्स. काळी, निळी किंवा ग्रे रंगाची एकच जीन्स असली तरी तिच्यावर वेगवेगळे ५ ते ६ टॉप अगदी सहज चालून जातात. म्हणूनच तर हल्ली तरुणाई अगदी सर्रासपणे जीन्स घालते.

तरुणाईच नाही तर आजकाल प्रौढ व्यक्ती किंवा अगदी वयस्कर मंडळीही आवडीने जीन्स घालताना दिसत आहेत. आपली आवडती जीन्स अधिक काळ टिकावी, चांगली फ्रेश दिसावी म्हणून ती धुताना मात्र थोडी काळजी घेतली पाहिजे आणि काही चुका टाळल्या पाहिजेत.

जीन्स धुताना काय काळजी घ्यावी...

1. आदळ आपट नको

जीन्स आपल्याला दिसायला एकदम दणकट दिसते. पण म्हणून ती धुतानाही तशीच जोरजोरात धुवावी असं मात्र मुळीच नाही. त्या उलट जीन्स अगदी हळूवारपणे धुतली पाहिजे. जीन्स दगडावर आपटू नये.

2. जीन्स धुताना ती नेहमी उलटी करावी. म्हणजेच जीन्सच्या आतली बाजू बाहेर काढावी आणि नंतरच जीन्स धुवावी. याचं कारण असं की जीन्स जर सरळ धुतली तर साबण, डिटर्जंट यामुळे ती भुरकट दिसू शकते.

3. जीन्स पिळू नये

एरवी आपण कपडे धुतले की ते पिळून त्याच्यातलं पाणी काढून घेतो. पण जीन्सच्या बाबतीत असं करू नये. जीन्स जोरजोरात पिळू नये. कारण तिच्यातला घट्टपणा निघून जातो आणि ती सैलसर होऊन जाते.

4. जीन्स धुण्याची योग्य पद्धत

जीन्स धुण्यासाठी बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये उलटी करून जीन्स अर्धा तास भिजत ठेवा. मशिनमध्ये धुणार असाल तर नेहमी सॉफ्ट मोडवर ठेवा आणि ड्रायरमधून पिळू नका. 

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT