Low BP sakal
लाइफस्टाइल

Low BP Control Tips: बीपी कमी झाल्यास घाबरू नका, हे घरगुती उपाय करून पहा

अचानक रक्तदाब कमी झाला तर करा हे घरगुती उपाय.

Aishwarya Musale

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोक अशा अनेक आजारांना बळी पडत आहेत. यापैकी एक आजार म्हणजे कमी रक्तदाब. आरोग्य तज्ञांच्या मते, कोणत्याही निरोगी व्यक्तीचा रक्तदाब साधारणपणे 120/80 mmHg असावा. जेव्हा हा रक्तदाब 90/60 mmHg पेक्षा कमी होतो तेव्हा त्याला कमी रक्तदाब म्हणतात.

एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो

त्यामुळे माणसाला चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, थकवा आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवतात. त्यावर योग्य वेळी नियंत्रण न ठेवल्यास रुग्णाला हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. आज आम्‍ही तुम्‍हाला कमी रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी 3 खास गोष्‍टी सांगणार आहोत, ज्याच्या सेवनाने तुम्‍ही स्‍वत:ला या आजारापासून दूर ठेवू शकता.

मनुका

कमी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तुम्ही मनुका खाऊ शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 4-5 मनुके पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर, रिकाम्या पोटी त्या याचे सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते पाणीही पिऊ शकता. असे केल्याने तुमचा रक्तदाब सामान्य राहील.

अश्वगंधा

लो बीपी नियंत्रित करण्यासाठी देखील अश्वगंधाचा वापर फायदेशीर मानला जातो. त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. याचे सेवन करण्यासाठी एक चमचा अश्वगंधा चूर्ण घ्या. यानंतर अर्धा ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात ही पावडर मिसळून सेवन करा. ही पावडर दिवसातून दोनदा घेतल्यास तुमचे बीपी नियंत्रणात राहते.

तुळशीची पाने

ज्यांना लो बीपीची समस्या आहे त्यांच्यासाठी तुळशीची पाने रामबाण उपाय म्हणून काम करतात. यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. अशा अनेक अँटी-ऑक्सिडंट्स देखील यामध्ये आढळतात, जे नियमित रक्तदाब राखण्यास मदत करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रक्तदाब कमी झाल्यास 4 तुळशीची पाने स्वच्छ करून हळूहळू चावावीत. असे केल्याने तुम्ही तंदुरुस्त व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

नवरा कोट्यवधींचा मालक तरीही लोकप्रिय अभिनेत्रीवर आली शेण उचलायची वेळ? व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT