Happy parenting sakal
लाइफस्टाइल

हॅप्पी पेरेंटिंग : जगण्यासाठीचा ‘बीटीएस’ सूर

एक १३-१४ वर्षांचा बारकासा ‘टीनेजर’ स्वत:ला ‘आर्मी’ म्हणत होता. कुतूहलापोटी त्याला विचारलं, ‘तुला सैनिक व्हायचंय का?’ त्यानं मान झटकली, केस उडवले आणि हसत उत्तर दिलं, ‘छे! माझी आर्मी ‘बीटीएस’ची.

डॉ. सुनील गोडबोले, बालविकास तज्ज्ञ.

एक १३-१४ वर्षांचा बारकासा ‘टीनेजर’ स्वत:ला ‘आर्मी’ म्हणत होता. कुतूहलापोटी त्याला विचारलं, ‘तुला सैनिक व्हायचंय का?’ त्यानं मान झटकली, केस उडवले आणि हसत उत्तर दिलं, ‘छे! माझी आर्मी ‘बीटीएस’ची. आमची आर्मी जगभर पसरली आहे, आमचे सव्वा कोटींहून जास्त मेंबर्स आहेत. हा पठ्ठ्या बीटीएस या के-पॉय बॅंडचा ‘फुल’ वेडा होता. या शब्दांचे अर्थ कळायला जरा वेळच लागत होता.

‘के-पॉय’ म्हणजे दक्षिण कोरियातील नृत्यसंगीताचा शॉर्टफॉर्म. साधारणत: नव्वदच्या दशकात अत्यंत शिस्तीत, सरकारी नियमांच्या धाकात, दक्षिण कोरियात ३ मोठे स्टुडिओ या ‘के-पॉय’चे बॅंड तयार करत होते. त्यावेळेस गाण्याचे शब्द, नाचण्याची स्टाईल, इतकंच काय तर त्यात काम करणाऱ्या कलाकारांनी काय बोलायचं त्यावरही नियंत्रण होतं.

या सगळ्याला छेद देत २०१० मध्ये बीटीएस बँड उदयाला आला- कुठलंही बंधन न ठेवता, समाजातील, युवकांमधील ताणतणाव, अस्वस्थता, भावना - सगळं काही या ‘सात’ जणांच्या गाण्यांमधे, नृत्यामध्ये दिसायला लागलं. शाळकरी दिसणाऱ्या या सात मुलांच्या बॅंडनं पहिलं गाणं २०१३ मध्ये सादर केलं आणि त्यानंतर त्यांच्या अल्बम्सनी जगभर धुमाकूळ घातला. तरुणाई, त्यातही १० ते १५ वर्षांच्या मुलामुलींमध्ये बीटीएसची प्रचंड क्रेझ आहे. बीटीएस म्हणजे कोरियन भाषेत ‘बँगटन सोनयानडन’, आता इंग्लिशमध्ये हा बॅंड स्थान बियॉंड द सीन (Beyond The Scene) म्हणवतो.

दुर्दैवानं अंधानुकरण करणाऱ्या आपल्या तरुण पिढीनं नको तितकं स्वातंत्र्य, मुलींसारखे मुलांचे पेहराव, केशभूषा, मुलंही सुंदर दिसू शकतात, प्रेमाच्या स्वैराचाराकडे झुकणाच्या व्याख्या एवढंच घेतलं. वयात येताना यातून मुलांच्या डोक्यात ‘लैंगिकता’, ‘स्त्री-पुरुष संबंध’ याबद्दल प्रचंड गोंधळ उडतोय; पण तरीही याच बीटीएसच्या गाण्यांतून चांगले संदेशही दिले जातात.

1) तुमचा स्वतःचा वेग असतो. थांबणं ठीक आहे. समजल्याशिवाय धावू नका. (अल्बम पॅराडाईज)

2) जेव्हा प्रेम असतं, तेव्हा सुरक्षितता असावी (अल्बम मॅजिक शॉप)

3) रडणं सामान्य आहे. रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही. (मिन सुगा, बीटीएस गायक)

4) तुम्ही एकटे नाही आहात. (बीटीएसची आर्मी तुमच्यासोबत आहे) (अल्बम विंग्ज)

5) खरं प्रेम स्वतःवर प्रेम करण्यापासून सुरू होतं, स्वतःसाठी बोला (बीटीएसचा मुख्य गायक ‘आर-एम’नं युनायटेड नेशन्सच्या २०२१च्या सभेत बोलताना हा संदेश दिला.)

6) तरुण मित्रांनो, जगातल्या चांगल्या-वाईटाचं बीटीएस हे एक उदाहरण आहे! आपण त्यातलं ‘चांगलं काय घ्यायचं’ एवढंच बघू या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT