Sibling feud brother sister
Sibling feud brother sister sakal
लाइफस्टाइल

हॅप्पी पेरेंटिंग : भावंडांतील भांडण

डॉ. सुनील गोडबोले, बालविकास तज्ज्ञ.

नुकतीच राखीपौर्णिमा होऊन गेलीय. भावा-बहिणीतील प्रेमावर उदंड लेखन, मेसेजेस झाले आहेत. छान फोटोही शेअर होत आहेत; पण रोजच्या जीवनात मात्र आई-वडील आपल्याच लाडक्या मुलांमधील रोजचीच भांडणं सोडवण्यात मेटाकुटीस आलेले असतात.

भावंडे का भांडतात?

‘एकच आई आणि एकच बाबा’ प्रत्येक मुलाला संपूर्ण हवे असतात. वाटेकरी नको असतो. लहान बाळाला नैसर्गिकरित्या जास्त लक्ष द्यावे लागते. मोठ्याला/मोठीला हे मान्य नसते. ‘मुलगा आणि मुलगी’ यांच्या संगोपनातील फरक, समाजाच्या अपेक्षा त्रासदायकच. तुलनेचा राक्षस- विशेषतः एक प्रतिभावंत आणि दुसरे पास होताना झगडत असेल, तर दोघांच्या तुलनेमुळे दरी वाढतेच.

भिन्न स्वभाव व व्यक्तिमत्त्व : एखादं मूल ‘शांत’ असते, तर दुसरे दंगेखोर. मग या दोन मुलांमध्ये ‘भांडण’ तर होणारच. एखादे मूल विशेष गरजा असलेले असेल, तर त्या मुलाला पालकांकडून जास्त मदत लागते. अशा वेळेस ‘नॉर्मल’ मुलाला त्या ‘विशेष’ मुलाचा तिरस्कार वाटू शकतो.

प्रत्येक घरी, प्रत्येक वेळी कारणे वेगवेगळी असू शकतात, वयोगटसुद्धा वेगळा असू शकतो; पण एकदा भांडण सुरू झाले, की महायुद्ध सुरू झाल्याचा भास होतो. कुणाची बाजू घ्यायचे हे कळत नाही. काही वेळा तर याचा शेवट हा पालकांमधील भांडणापर्यंत पोचतो. भावंडातील भांडणे टाळता तर येत नाहीत; परंतु नियंत्रणात तर ठेवता येतील.

सुरुवात गरोदरपणापासूनच होते. येणारं बाळ कसं परावलंबी असतं आणि मोठं मूल आई-बाबांना मदत करू शकते हे कळलं, तर मोठ्याचा अहंकार सुखावतो. लहानग्याचं कौतुक करताना मोठ्याची आठवण ठेवणं पुरेसं असतं. तुलना टाळावी हे जितकं महत्त्वाचं तितकंच कष्टाचंही! प्रत्येकाच्या यशापयशाची तुलना दुसऱ्याशी न करता त्याच्याच/ तिच्याच आधीच्या यशाशी करावी.

एक मूल बाबांचं आणि दुसरं मूल आईचं अशी विभागणी कधीच करू नये. एवढं करूनही भांडण झाल्यास, कळत्या वयातील (पाच वर्षांपेक्षा मोठी) मुलं असल्यास लक्षपूर्वक दुर्लक्ष हेच उत्तम! शक्यतो कुणा एकाची बाजू घेऊ नये.

अगदीच मुलं हमरीतुमरीवर आली, तर वेगळं करून दूर करा. सहसा भावंडं कितीही भांडली, तरी एकमेकांपासून दूर खाणं हीच शिक्षा असते. एकत्र खेळता येईल, नवीन रचनात्मक काम करता येईल असे खेळ, प्रकल्प हाती घेऊन मोठ्यांनी मदतनीसाची भूमिका घ्यावी. त्यातून आपोआपच नात्यांची वीण नष्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT