लाइफस्टाइल

Lemon Tea Benefits : चहाऐवजी दिवसाची सुरुवात करा 'लेमन टी'ने ; रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासह होतील अनेक फायदे

नेहमीचा चहा पिण्यापेक्षा लेमन टी पिण्याचे आहेत भरपूर फायदे

Aishwarya Musale

अनेकांना लेमन टी प्यायला आवडते. केवळ त्याची चवच नाही तर लेमन टीचे फायदेही अतुलनीय आहेत. जर तुम्ही रोज एक कप लेमन टी प्याल तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. विशेषत: आजकाल लोक रोगप्रतिकारक शक्तीसाठी लेमन टीचे सेवन करतात, कारण लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप महत्वाचे मानले जाते.

लेमन टीमध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण असल्याने, ते वजन कमी करण्यास उपयुक्त आहे आणि इतर अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. लिंबूमध्ये काही नैसर्गिक घटक असतात जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय, ते तुम्हाला ताजेतवाने ठेवते आणि ते आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यासोबतच उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी लेमन टी खूप फायदेशीर मानली जाते.

दररोज लेमन टी पिण्याचे आरोग्य फायदे

1. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी फायदेशीर

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले लोक दिवसातून एकदा लेमन टीचे सेवन करून रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतात. उच्च रक्तदाबावर लेमन टी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये पोटॅशियम आढळते, त्यामुळे उच्च रक्तदाबामध्ये ते खूप फायदेशीर ठरते. सामान्य रक्तदाब राखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. उच्च रक्तदाब असलेले लोक चहाऐवजी हा लेमन टी घेऊ शकतात.

2. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लेमन टीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा गुणधर्म असतो. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांना स्वतःपासून दूर ठेवू शकता. दररोज एक कप लेमन टीचे सेवन करा.

3. वजन नियंत्रणात राहते

जे लोक वजन कमी करत आहेत त्यांच्यासाठी लेमन टी पिणे फायदेशीर ठरू शकते. जर तुमचे वजन वाढत असेल तर तुम्ही लेमन टीच्या सेवनाने ते नियंत्रणात ठेवू शकता. लिंबूमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज आढळतात. यामुळेच लेमन टीचा वापर वजन कमी करण्यात मदत करू शकतो.

4. हायड्रेटेड करते

तज्ज्ञांच्या मते, महिलांनी दिवसातून किमान 2.5 लिटर आणि पुरुषांनी दिवसातून किमान 3.5 लिटर पाणी प्यावे. आपण अनेकदा योग्य प्रमाणात पाणी पित नाही ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी लेमन टी हा उत्तम पर्याय आहे. लेमन टीचे सेवन केल्याने तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : 'मोर्चा निघणार म्हणजे निघणार..'; अविनाश जाधवांच्या अटकेनंतर संदीप देशपांडेंचा इशारा

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT