Driving Tips esakal
लाइफस्टाइल

Driving Tips : छोटया गोष्टींचे मोठे परिणाम; एक चूक अन् गमवाल प्राण

या गोष्टी माहित असूनही दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

वैष्णवी कारंजकर

कार, बाईक किंवा कोणतीही गाडी चालवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा आपण अगदी छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतात. आजच्या या लेखात आपण याच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

सीट बेल्ट

कारमधलं सीट बेल्ट हे अगदी बेसिक फिचर आहे. पण हे तितकंच महत्त्वाचं आहे. अपघात झाल्यास पुढच्या आणि मागच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तींचा जीव वाचवण्यात सीट बेल्ट महत्वाचा ठरतो. २०२१ च्या आकडेवारीनुसार, कार अपघातात ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यातल्या ८३ टक्के लोकांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे कारमध्ये बसल्यावर कार सुरू करण्याआधी कारमधल्या सर्वांनी सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे.

फोनवर बोलणे

अनेक ड्रायव्हर्सकडून होणारी एक साधारण चूक म्हणजे फोनवर बोलणे. गाडी चालवताना फोनवर बोलल्याने चालकाचं लक्ष एकाग्र राहत नाही, आणि अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे कार चालवताना फोनवर बोलू नये, बोलायचंच असेल तर एखाद्या सुरक्षित जागी बाजूला कार उभी करून फोनवर बोलावे.

सनरुफ

सनरुफमधून बाहेर डोकावणे धोकादायक असू शकतं. बऱ्याचदा लहान मुलं सनरुफमधून बाहेर डोकावत असतात. पण असं करणं बेकायदेशीर आहे. असं केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

राँग साईड ड्रायव्हिंग

बऱ्याचदा लोक थोडा वेळ वाचवण्यासाठी थोडं अंतर उलट्या दिशेने प्रवास करतात. पण हे गैर आहे. असं केल्याने तुम्ही स्वतःसोबत इतरांचाही जीव धोक्यात घालत आहात.

हेल्मेट न घालणे

सरकार आणि पोलीस वारंवार आवाहन करत असतानाही बरेच जण हेल्मेट न घालता गाडी चालवताना दिसत आहेत. हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याने अपघाताच्या वेळी तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते आणि जीवही जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT