लाइफस्टाइल

Hair Care : या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कमी वयातच केस पांढरे होतात, काय आहे उपाय?

कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात?

Aishwarya Musale

सौंदर्य खुलवण्यात केसांचा मोठा वाटा असतो. पण बहुतेकांना केसांशी संबंधित समस्या भेडसावत आहेत. अनेकदा लोकांचे केस कमी वयातच पांढरे होतात. जर आपण पूर्वीच्या काळाबद्दल बोललो तर ही समस्या वयाच्या 35 किंवा 40 व्या वर्षी दिसून येत होती, परंतु आता 10 वर्षांच्या मुलांचे केस देखील पांढरे होत आहेत. ते लपविण्यासाठी लोक अनेकदा मेहंदी किंवा डाई, कलर वापरतात. पण थोड्या दिवसानंतर पुन्हा पांढरे केस दिसायला लागतात. शरीरातील काही जीवनसत्त्वांची कमतरता केस पांढरे होण्यास कारणीभूत असते. जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.

कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात?

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता केस पांढरे होण्यास कारणीभूत आहे. होय, जेव्हा तुमच्या शरीराला व्हिटॅमिन बी 12 पुरेशा प्रमाणात मिळत नाही, तेव्हा केसांच्या काळ्या रंगासाठी जबाबदार असलेल्या मेलेनिनचे उत्पादन कमी होऊ लागते. त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.

व्हिटॅमिन बी 12 लाल रक्तपेशी तयार करण्यात मदत करते. जेव्हा व्हिटॅमिन बी 12 ची पातळी कमी होऊ लागते, तेव्हा पोषण तुमच्या केसांच्या फोलिकल्सपर्यंत पोहोचत नाही, ज्यामुळे केस खराब होऊ लागतात आणि केस पांढरे होऊ लागतात. यासोबतच केस गळणेही सुरू होते. जे लोक जास्त ताण घेतात त्यांचे केस अकाली पांढरे होऊ लागतात.

हे उपाय करा

व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ खा.

दुग्धजन्य पदार्थ, मासे, दूध, दही हे व्हिटॅमिन बी 12 चे उच्च स्रोत आहेत.

धुम्रपान करू नका.

अँटिऑक्सिडेंट समृध्द पदार्थांचे सेवन करा.

तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी मेडिटेशन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT