Dussehra 2024: Sakal
लाइफस्टाइल

Dussehra 2024: विजयदशमीला 'हे' उपाय केल्यास दारिद्र्यासह साडेसातीचा त्रासही होईल कमी

Dussehra 2024 Guide and Rules: यंदा विजयादशमी १२ ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी साजरी केली जाणार आहे. तुम्हाला दारिद्र्य आणि साडेसातीपासून सूटका हवी असेल तर पुढील काही घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

Dussehra 2024: हिंदू धर्मात दसऱ्याला खुप महत्व आहे. यंदा 12 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी दसरा साजरा केला जाणार आहे. दसऱ्यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते. या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता असे मानले जाते तर श्रीरामांनी लंकेत जाऊन रावणाचा वध केला होता. यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी वाईट सवयी सोडून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायची शिकवणे देते. विजयादशमी शनिवारी आल्याने तुम्ही पुढील काही उपाय करू शकता. ज्यामुळे दारिद्र्य आणि सातेसातीपासून सुटका मिळू शकते.

अपराजित फुलांची पूजा

दसऱ्याच्या दिवशी अपराजित फुलांची पूजा करावी. तुमच तुमचे कोणते काम थांबले असेल तर हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुम्ही हातात देखील हे फुल बांधू शकता.  

सुंदरकांड पाठ

तुम्हाला आजार दूर ठेवायचे असेल तर दसऱ्याच्या दिवशी संदरकांड ठेऊ शकता. याचे पठण करणे शुभ मानले जाते. सुंदरकांड हे शनिवारी करणे शुभ मानले जाते. हातात नारळ ठेऊन हे पाठ करावा आमि नंतर रावण दहनात टाकावे.

पिवळ्या गोष्टींचे दान

दसऱ्याला ब्राम्हणांना किंवा गरिबांना पिवळ्या गोष्टींचे दान करावे. यात वस्त्र, नारळ, मिठाई किंवा फळांचा समावेश करू शकता. यामुळे आर्थिक समस्या दूर होईल.

हनुमान चालीसा

शनिदेवाच्या साडेसातीपासून सुटका हवी असेल तर दसऱ्याला हनुमान चालीसाचे पठण करावे. तसेच शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे साडेसातीचा त्रास कमी होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT