Budget Friendly Dussehra Decoration Idea: Sakal
लाइफस्टाइल

Dussehra Decoration Idea: डेकोरेशनचं टेंशन आलय? दसऱ्याला 'या' सोप्या पद्धतीने सजवा घर, सर्वजण करतील कौतुक

Budget Friendly Dussehra Decoration Idea: नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे. यंदा घराला नवीन पद्धतीने सजावट करायची असेल तर पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.

Puja Bonkile

Budget Friendly Dussehra Decoration Idea: हिंदू धर्मात दसऱ्याला खुप महत्व आहे. यंदा 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता असे मानले जाते तर श्रीरामांनी लंकेत जाऊन रावणाचा वध केला होता. यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. हा दिवस वाईट सवयी सोडून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायची शिकवणे देते. दसऱ्याला शुभ कार्य केली जातात. तसेच यंदा दसऱ्याला कमी खर्चात सुंदर पद्धतीने सजवायचे असेल तर पढील पद्धतींचा वापर करू शकता.

रांगोळी काढणे

कोणत्याही शुभ कार्यात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. दसऱ्याला घराच्या अंगणात किंवा दारासमोर सुंदर रांगोळी काढून घराती सजावट करू शकता. आजकाल काचेच्या टेबलवर रांगोळी काढण्याचा ट्रेंड आहे. तसेच तुम्ही घरात रांगोळीचे रंगीत आणि विविध डिझाइनचे स्टिकर देखील लावू शकता. यामुळे घराचे सौंदर्य अधिक वाढेल.

झेंडूच्या माळा

यंदा दसऱ्याला घराची सजावट करायची असेल तर झेंडुच्या फुलांच्या माळांचा वापर करू शकता. झेंडुच्या फुलांच्या माळा घरातील प्रवेश द्वारावर किंवा पायावर ठेऊन सजावच करू शकता. तुम्ही घरी झेंडुच्या माळा बनवू शकता किंवा बाजारात विविध फुलांच्या माळा मिळतात. त्या घरी आणून दार, खिडक्या किंवा एखाद्या कोपऱ्याची सजावट करू शकता.

तोरण

दसऱ्याला घरातील प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावणे शुभ मानले जाते. तुम्ही यंदा दसऱ्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावून घराची शोभा वाढवू शकता. बाजारात विविध आकारांमध्ये प्लॅस्टिकचे तोरण देखील मिळते.

मातीचे मटके

दसऱ्याला घराची खास सजावट करायची असेल तर घरातील कोपऱ्यांमध्ये मातीचे मटके ठेऊ शकता. लहान किंवा मोठे असे एकावर एक मडके ठेऊन त्यावर फुलांच्या माळा ठेवल्यास घराची शोभा अधिक वाढेल. तसेच घरी येणारे पाहूणे देखील सजावट पाहून कौतुक करतील.

हॉलमध्ये करा खास सजावट

आजकाल हॉलची सजावट करण्यासाठी विविध सजावटीच्या वस्तू बाजारात मिळतात. तुम्ही काचेच्या बाउलमध्ये गुलाब किंवा झेंडु यासारख्या फुलांच्या पाकळ्या टाकून त्यात दिवा लावू शकता. रात्रीच्या वेळी अशी सजावट अधिक आकर्षक दिसेल.

लायटिंगची सजावट

तुम्ही रात्री घराला रोषनाईने सजवू शकता. यासाठी बाजारात मिळणाऱ्या विविध आकारातील आणि रंगीत लाइटिंगने घराची सजावट करू शकता. यामुळे घर अधिक आकर्षक दिसेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांसाठी ‘जॅकपॉट’! IPL 2026 चा थरार गहुंजेत… युवा खेळाडूंच्या संघाचं होम ग्राऊंड! 2022 नंतर पहिल्यांदाच...

Zilla Parishad Election : अखेर ठरलं! जिल्हा परिषद निवडणूक होणार जाहीर, प्रशासकीय कामांना गती; सोमवारी घोषणा शक्य

Sangli Crime : तेच ठिकाण वेळही तीच, बदला घेतलाच! कॉलेजच्या दारातच तरुणावर चाकूने 14 सपासप वार; मांडी, डोके, हात, पोटावर घाव

Pune News:'पेरणे फाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभास वंदन'; लाखो आंबेडकरी अनुयायांचा उसळला जनसागर, रात्री उशिरापर्यंत अखंड रांगा!

Solapur Crime: साेलापुरात तृतीयपंथीचा खून, तिघांना पाच दिवसांची वाढीव कोठडी; तपासात धक्कादायक माहीती आली समाेर..

SCROLL FOR NEXT