Dussehra 2024: Sakal
लाइफस्टाइल

Dussehra 2024 Vastu Tips: आज विजयादशमीनिमित्त लावा शनिदेवाचे 'हे' रोप , साडेसातीसह संकटे होतील दूर

Dussehra 2024 Vastu Tips: आज देशभरात दसरा मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शमीच्या रोपाची पूजा केल्यास घरातील सर्व संकट दूर होतात आणि शनिदेव देखील प्रसन्न होतात.

Puja Bonkile

Dussehra 2024 Vastu Tips: दसऱ्याच्या दिवशी लोक शस्त्रपुजन करतात. तसेच अनेक उपाय करतात. असे मानले जाते की या उपायांमुळे ग्रह दोष आणि वास्तु दोष देखील दूर होतात. शारदीय नवरात्रीनंतर विजयादशमी साजकी केली जाते. तसेच रावणाच्या पुतळाटे दहन केले जाते. यंदा १२ ऑक्टोबरला दसरा साजरा केला जात आहे.

दसऱ्याला शमीच्या रोपाची पूजा करणे शुभ मानले जाते. घरात शमीचे रोप लावायचे असेल तर आजचा दिवश शुभ मानला जात आहे. यंदा दसरा शनिवारी आला आहे. शमीला शनिदेवाचे रोप मानले जाते. शमीची पाने देखील भगवान शंकराला अर्पण केली जातात. तसेच माता दुर्गा आणि गणेशाच्या पूजेमध्ये शमीची पाने अर्पण करणे शुभ मानले जाते.आज घरात शमीचे रोप कुठे लावावे आणि त्याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.

शमीचे रोप कुठे लावावे?

यंदा दसरा शनिवारी आल्याने शमीचे रोप लावणे शुभ मानले गेले आहे. पण शमीचे रोप लावताना काळजी घ्यायला हवी. वास्तुनुसार घराबाहेर, अंगण किंवा बाल्कनीत शमीचे रोप लावणे शुभ मानले जाते. तसेच दक्षिण दिशेला शमीचे रोप लावावे. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने संकट दूर होऊन शनिशी संबंधित दोष दूर होतात. तसेच साडेसाती कमी होऊन सुख-समृद्धी वाढते.

दसऱ्याच्या दिवशी शमीच्या रोपाची पूजा का केली जाते?

धार्मिक मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी कुबेराने राजा रघुला सोन्याचे नाणे दिले आणि शमीची पाने सोन्यात बदलली. त्यामुळे शमीची तुलना सोन्याशी केली जाते. तसेच रावणाशी युद्ध करण्यापूर्वी प्रभू श्रीरामांनी शमीच्या रोपाची पूजा केली होती, असेही म्हटले जाते.

दसऱ्याला शमीचे रोप का लावतात?

शमीचे पान सोन्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करणे आणि रोप लावणे शुभ मानले जाते. यामुळे शनिदोषासोबतच राहू-केतू दोषही नाहीसा होतो. यंदा शनिवारी दसऱ्याचा दिवस असल्याचा शुभ योगायोग आहे. अशावेळी या दिवशी शमीचे झाड लावल्यास किंवा त्याची पूजा केल्यास दुप्पट फायदा होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election Postponed in Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर, महायुतीचे संचालक गैरहजर; कोरमअभावी सभा तहकूब, सतेज पाटील काय करणार?

MLC Results : उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तशी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर... नागपूर, पुण्यात भाजपच्या पराभवानंतर केशव उपाध्ये यांची पोस्ट चर्चेत

IND vs NZ, 4th T20I: ईशान किशन फिट झाला, तर Playing XI मधून बाहेर कोण जाणार? सॅमसन-सूर्यवंशीबाबत काय निर्णय घेतला जाणार?

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

पराभव भाजपच्या जिव्हारी, महायुतीत मिठाचा खडा! शिवसेना युतीधर्म पाळणार का? बन यांचा थेट शिंदेंना सवाल

SCROLL FOR NEXT