लाइफस्टाइल

कोणालाही दिसणार नाहीत लव्हबाईट्सचे डाग; वापरा 'या' ट्रिक्स

लव्ह बाईट्सचे डाग शरीरावर किंवा चेहऱ्यावर राहिले तर अनेकदा ओशाळल्यासारखं वाटतं.

शर्वरी जोशी

आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. काही जण गिफ्ट देऊ, डेटवर नेऊन आपल्या पार्टनरला खूश करत असतात. तर, काही जण एकांतात आपलं प्रेम व्यक्त करत असतात. मात्र, अनेकदा एकांतात हे प्रेम व्यक्त करत असताना व्यक्तीच्या शरीरावर लव्ह बाईट्स येतात. आता लव्ह बाईट्स म्हणजे काय हे कोणालाही सांगायची वेगळी आवश्यकता नाही. परंतु, हे लव्ह बाईट्सचे डाग शरीरावर किंवा चेहऱ्यावर राहिले तर अनेकदा ओशाळल्यासारखं वाटतं. चारचौघात हे डाग पटकन लोकांचं लक्ष वेधून घेतात. त्यातूनच मग मित्र-परिवारात आपल्या पर्सनल लाईफची खिल्लीही उडवली जाते. म्हणूनच, हे लव्ह बाईट्सचे डाग काढण्याच्या काही सोप्प्या ट्रिक्स आहेत. या ट्रिक्स कोणत्या ते पाहुयात. (love-easy-tricks-to-get-rid-of-love-bites)

कोल्ड ट्रिटमेंट -

शरीरावर लव्ह बाईट्सचे डाग असल्यास ते घालवण्यासाठी कोल्ड ट्रिटमेंट परफेक्ट उपाय आहे. यासाठी कोल्ड कम्प्रेस ठेवा. जर तुमच्याकडे कोल्ड कम्प्रेस नसेल तर बर्फाचे काही तुकडे रुमालात बांधून त्यांनी लव्ह बाईटचा भाग शेकावा. साधारणपणे २० मिनीटे हा प्रयोग केल्यावर लव्ह बाईट्चे डाग जातात.

२. हीट थेरपी -

कोल्ड थेरपीप्रमाणेच हीट थेरपीदेखील फायदेशीर ठरते. विविध प्रयोग केल्यानंतरही लव्ह बाईटचे डाग जात नसतील तर तो भाग गरम कापडाने शेकावा. यासाठी एखादा रुमाल घेऊन तो तव्यावर गरम करावा आणि त्याने तो ठराविक भाग शेकावा. यामुळे साखळलेलं रक्त सुरळीत होतं.

३. टूथब्रश ट्रिक्स -

लव्ह बाईटचे डाग जात नसल्यास तो भाग टूथब्रशने रगडावा. त्यामुळे त्या भागातील ब्लड क्लॉटिंग थांबवलं जातं आणि थोड्यावेळा हे डाग ही दूर होतात.

४. टूथपेस्ट -

टूथब्रशप्रमाणे टूथपेस्टमुळेही हे डाग जाऊ शकतात. त्यासाठी मिंट फ्लेवर असलेली पेस्ट लव्ह बाईटवर लावावी. ठराविक वेळेनंतर येथील रक्तपुरवठा सुरळीत होतो व हे डाग जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Loal: मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार, कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर गाठता येणार; लोकल कधीपासून सुरू होणार?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Mumbai News: मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

SCROLL FOR NEXT