relationship tips
relationship tips sakal
लाइफस्टाइल

जोडीदाराची फसवणूक केल्याबद्दल पश्चाताप होतोय? या प्रकारे मागा माफी

सकाळ डिजिटल टीम

कोणतेही नातं विश्वासावर टिकतं. नात्यात जर जोडीदाराची फसवणूक होत असेल तर नातं फार काळ टिकत नाही. हल्ली फसवणूकीच्या किंवा जोडीदाराला चीट करण्याच्या कारणावरुन अनेकदा ब्रेकअप किंवा घटस्फोट होत असल्याचे दिसते. पण कधी कधी जोडीदाराची फसवणूक केल्यावर पश्चातापाची वेळ येते मग अशा वेळेस जोडीदाराची माफी कशी मागावी, असा प्रश्न पडतो. (Easy way to apologize to your partner for cheating on them check here)

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीरादाची माफी मागू शकाल आणि ते तुम्हाला माफही करतील

  • अफेअर जास्त काळ नसावे. कारण जास्त काळ ते गुपीत ठेवल्याने तुमच्या जोडीदारामध्ये विश्वासघाताची भावना निर्माण होईल. त्यामुळे वेळ न घालवता लगेच चुकीची कबूली द्यावी.

  • जर तुम्हाला भीती वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमचं ऐकणार नाही तर पत्राद्वारे त्यांची माफी मागा. जरी ते चिडलेले असतील तरी त्या पत्रात काय आहे, याची कुतूहल त्यांना असणार आणि ते तुमची बाजू जाणून घेण्यासाठी ते पत्र नक्की वाचतील.

  • तुम्ही ज्या व्यक्तीसोबत होता ते नातं तुम्ही संपवले आहे आणि त्या व्यक्तीशी बोलणंही बंद केले आहे, हे जोडीदाराला विश्वासात घेऊन सांगा आणि त्याप्रमाणे वर्तनही करा जेणे करुन तुमचा जोडीदार तुमच्यावर विश्वास ठेवणार.

  • तुमची माफी बिनशर्त असावी."तुम्ही मला एकदा माफ केल्यास, मी हे करणार..." माफी मागताना असे विधान करु नका.

  • माफी मागितल्यानंतर त्यांना वेळ द्या. त्वरीत उत्तराची अपेक्षा करू नका.जेव्हा ते स्वत:हून तुम्हाला माफ करेल तेव्हाच तुम्हाला खरी माफी मिळेल.

  • तुमच्या अफेअरसाठी जोडीरादाला दोष देऊ नका.आपले बनत नसल्याने माझ्याकडून अफेअर झाले, असे चुकूनही म्हणू नका. तुमची चूक तुम्ही मनापासून स्वीकारली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT