Navratri  sakal
लाइफस्टाइल

Navratri 2023: ताजे पदार्थ खा, शिळ्या भगरीत तयार होते विष

भगरीपासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करून खाल्ले जातात.

Aishwarya Musale

भगर खाताय; बाळगा सावधगिरी

नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून भाविकांनी रविवारपासून उपवासाला प्रारंभ केला आहे. नऊ दिवस उपवासाला भगर, फळे खाल्ली जातात. दरम्यान भगर खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. यामुळे भगर खाताना महिलांनी काळजी घ्यावी असे आवाहन येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी केले आहे.

भगरीपासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करून खाल्ले जातात. फराळ तयार करण्यापूर्वी भगर स्वच्छ धुवावी. वाळवून त्याचे पीठ तयार करावे व नंतरच त्यापासून तयार केलेल्या दशम्या खाव्यात. ताजे पदार्थ करून खावेत असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. भगर हे अन्न पचण्यासाठी हलके असते. यामुळे सतत नऊ दिवस तिचे सेवन करताना शक्यतो शिळी भगर खाण्याचे टाळावे. आवश्यक तेवढीच ताजी भगत तयार करून खावी. शिळ्या भगरीत विष तयार होते अशी माहिती डॉ.अमोल वाघ यांनी दिली.

उपवास म्हणजे फक्त शारीरिक उपवास नव्हे. उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ वास करणे. नवरात्रीनिमित्त उत्सव काळात मन प्रसन्न राहावे, मनात भगवंत चिंतन घडावे म्हणून शुद्ध आहाराचे सेवन करून उपवास करण्याचे संकेत दिले आहेत. माणसाने फक्त शारीरिक उपवास न करता वाचिक व मानसिक उपवासही केले पाहिजे.

आपल्या वाणीतून कोणाविषयी वाईट चिंतन न करणे म्हणजे वाचक उपवास होय. याचप्रमाणे मनामध्ये भगवंत चिंतन करून नामस्मरणात तल्लीन राहणे म्हणजे मानसिक उपवास होय. उत्सव काळात या तीन प्रकारच्या उपवासाची गरज आहे.

- रवी महाराज मुळे, पुरोहित, टेंभुर्णी

व्यापाऱ्यांनी शक्यतो नवीन आणलेल्या भगरीचीच विक्री करावी. जुनी साठवणूक केलेली भगर विक्री केल्यास उपवासधारकांना वाईट परिणामांचा सामना करावा लागतो. परिणामी व्यापाऱ्यांनाही याचा रोष पत्करावा लागतो. यामुळे महिलांनी शक्यतो बंद पाकिटातील भगर खरेदी करावी.

—मनीष सोमाणी, व्यापारी, टेंभुर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT