लाइफस्टाइल

Winter Diet Tips : हिवाळ्यात रिकाम्या पोटी खा 'हे' पदार्थ, आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

थंडीच्या दिवसात रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो.

Aishwarya Musale

हिवाळ्यात दिवसाच्या सुरुवातीलाच जर पोट साफ झाले नाही तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर होतो. जर तुम्हीसुद्धा सकाळी पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही पदार्थांची नावे सांगणार आहोत. हे पदार्थ रोज खाल्ल्याने तुमचे पोटही साफ होईल.

हिवाळ्यात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत असते, शिवाय तुमची पचन आणि चयापचय क्रिया मंदावते, त्यामुळे सकस आहार घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते पदार्थ कोणते ते जाणून घेऊया­.

मध

हिवाळ्यात कोमट पाणी आणि मधाने दिवसाची सुरुवात करा. खनिजे, जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स आणि एन्झाइम्सने मध समृद्ध असतो त्यामुळे तुमचे आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होते. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो.

अंडी

अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. दररोज अंडी खाल्ल्याने प्रथिनांची रोजची गरज सहज भागवता येते. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी नाश्त्यामध्ये अंड्यांचा समावेश करणे हा उत्तम पर्याय मानला जातो.

मनुका खाणे आरोग्यासाठी फायदेशीर


रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्सचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये मनुके खाणे तुमच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते. बदामाप्रमाणेच, मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा जेणेकरून पोषक तत्वांचे शोषण वाढेल. सकाळी त्याचे सेवन केल्याने तुमची उर्जा वाढण्यास मदत होते.

पपई

उपाशी पोटी पपई खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. पपई हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. त्यामुळे सकाळी नाश्ताच्या वेळी पपई खाणे कधीही उत्तम. पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी राहते. त्याचबरोबर अनेक आजार आणि मुख्य म्हणजे वजनही कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT