Post Workout Meal esakal
लाइफस्टाइल

Post Workout Meal : वर्कआऊट केल्यानंतर थकवा आलाय? मग, 'या' खाद्यपदार्थांचे करा सेवन

निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे हे महत्वाचे आहे. अनेक जण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी योगा, वर्कआऊट आणि व्यायामाची मदत घेतात.

Monika Lonkar –Kumbhar

Post Workout Meal : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे हे महत्वाचे आहे. अनेक जण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी योगा, वर्कआऊट आणि व्यायामाची मदत घेतात. काही जण जिममध्ये जाऊन इंटेन्स वर्कआऊट देखील करतात.

हे इंटेन्स वर्कआऊट केल्यानंतर अनेकांना थकवा येतो. आपले शरीर थकते. अशावेळी मग, शरीरातील ऊर्जा देखील कमी होते. ऊर्जेची ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

अशा स्थितीमध्ये हे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? जे तुम्ही पोस्ट वर्कआऊटनंतर खाऊ शकता, चला तर मग जाणून घेऊयात.

केळी

केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदके आणि पोटॅशिअमचा समावेश असतो. या पोषकघटकांमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. या पोषकघटकांमुळे स्नायूंच्या वेदनेची समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे, वर्कआऊट केल्यानंतर केळ्यांचा आहारात जरूर समावेश करा किंवा स्मूदीच्या रूपातही तुम्ही केळीचे सेवन करू शकता.

चिकन

प्रथिने आणि कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत म्हणून चिकनला ओळखले जाते. उकडलेले चिकन खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना मजबूती मिळते आणि स्नायूंची समस्या दूर होण्यास मदत होते. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही उकडलेले चिकन खाऊ  शकता. यासोबतच सूप देखील पिऊ शकता. यामुळे, तुम्हाला ऊर्जा मिळण्यास मदत होईल. उकडलेले चिकन खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

ओट्स

अनेक जण वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओट्सचा आहारात समावेश करतात. ओट्समध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी ओट्स अतिशय उपयुक्त आहेत.

ओट्समध्ये फायबर्स आणि कार्बोहायड्रेट्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, ओट्सचे सेवन केल्यानंतर आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. वर्कआऊट केल्यानंतर ओट्सचे सेवन अवश्य करा. यामुळे, शरीराला ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.

अंडी

प्रथिने आणि कॅल्शिअमचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंडी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही उकडलेली अंडी खाऊ शकता. यामुळे, तुमच्या थकलेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT