eat sakal
लाइफस्टाइल

Right Time To Eat: चुकीच्या वेळी खाल्ल्याने वाढते वजन, जाणून घ्या लंच आणि डिनरची योग्य वेळ?

जेवणाच्या चुकीच्या सवयींंमुळे वाढू शकते वजन.

Aishwarya Musale

आजकाल प्रत्येकजण लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहे. ही काही छोटी समस्या नाही, इतर अनेक मोठ्या समस्या त्यातून निर्माण होऊ शकतात. आपली जीवनशैली आणि आपल्या खाण्याच्या सवयी याला कारणीभूत आहेत. खरे तर असे बरेच लोक आहेत जे वेळ बघून नाहीतर भूक बघून जेवण करतात. दिवसा किंवा रात्री जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा ते त्याच वेळी अन्न खातात.

अनेक वेळा लोक नाश्ता करत नाहीत त्यामुळे त्यांना दिवसभर भूक लागते. लोक ओव्हर इट करतात. यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच शिवाय अनेक आजारांना आमंत्रणही मिळतं. अशा परिस्थितीत नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण योग्य वेळी करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया त्याची योग्य वेळ कोणती आहे...

नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

नाश्त्यासाठी योग्य वेळ

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने उठल्यानंतर 3 तासांच्या आत नाश्ता केला पाहिजे. सकाळी 7:00 ते 9:00 पर्यंत नाश्ता करण्याची सर्वोत्तम वेळ आहे. या वेळेत प्रत्येकाने नाश्ता करावा. यानंतर काहीही खाणे टाळावे. नाश्त्यात नेहमी फायबर आणि प्रथिनयुक्त पदार्थ खा. जसे आपण पोहे, ओट्स अंडी, दूध, रोटी, हिरव्या भाज्यांचा रस समाविष्ट करू शकता.

दुपारच्या जेवणाची योग्य वेळ

निरोगी जीवनशैलीसाठी, नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान 5 तासांचे अंतर असावे. जर तुम्ही सकाळी 9:00 वाजता नाश्ता केला असेल तर तुम्ही दुपारी 2:00 पर्यंत दुपारचे जेवण करू शकता.

स्नॅकसाठी योग्य वेळ

दुपारच्या जेवणानंतर थोडी भूक लागल्यास, संध्याकाळी 4:00 ते 5:00 ही संध्याकाळचा चहा आणि नाश्ता करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. पण यावेळी खूप हेवी नाश्ता न करण्याचा प्रयत्न करा. याचा परिणाम तुमच्या रात्रीच्या जेवणावर होऊ शकतो.

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ

अनेकदा लोक रात्री उशिरा अन्न खातात. असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. निरोगी राहण्यासाठी रात्रीचे जेवण संध्याकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत करावे. रात्रीचे जेवण झोपण्याच्या ३ तास ​​आधी खाल्ले पाहिजे, यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित चालते आणि लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठतेची शक्यता कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT