लाइफस्टाइल

Health Care News : तुम्हीदेखील भाज्यांच्या साली काढता का? या भाज्या सालीसकट खाणं आरोग्यासाठी उत्तम

'या' भाज्यांची साल फेकण्याची चूक करू नका...

Aishwarya Musale

भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात, पण तुम्हाला त्यांच्या सालीचे फायदे माहित आहेत का? आम्ही तुम्हाला सांगतो, त्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. काही भाज्या अशा आहेत ज्यांची साल आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे सेवन सालीसकट करायला हवे, जेणेकरून आपल्याला योग्य पोषण मिळेल

भोपळा

भोपळा अनेक घरांमध्ये आवडीने खाल्ला जातो. तुम्हाला माहिती आहे का की त्याची साल खाल्ल्याने तुम्ही त्वचेला होणारे फ्री-रॅडिकल नुकसान टाळू शकता. त्यात बीटा कॅरोटीन आणि झिंक देखील आढळतात, ज्यामुळे आपली शारीरिक क्षमता मजबूत होते. इतकेच नाही तर त्याची साल अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.

दुधीभोपळा

दुधीभोपळ्याची साल ही देखील गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. तुम्ही त्याची साल एअर फ्रायरमध्ये तळून आणि काही मसाले घालून खाऊ शकता.

बटाटा

बटाटा प्रत्येकाला आवडते. त्यातून अनेक पदार्थ तयार केले जातात. जर तुम्ही त्याची साल फेकून दिलीत तर तुम्ही अनेक आरोग्यदायी फायदे गमावाल. त्यामध्ये व्हिटॅमिन बी, फायबर, लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.

रताळे

यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे तुमच्या दृष्टीसाठी चांगले असते. व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि लोह देखील त्यात आढळते. त्यामुळे त्याची साल वाया जाऊ देऊ नका, ती खाऊन तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा.

काकडी

प्रत्येक सॅलडमध्ये आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या काकडीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन कमी करण्यासाठी देखील चांगले मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT